राजकीय पाठबळातून मातीसाम्राटांनी लावला एकच सपाटा

Image may contain: cloud, sky, grass, outdoor and nature
निमोणे, ता. 17 मे 2019 (तेजस फडके): सध्या घोड धरणात अत्यल्प पाणीसाठा असून पाणीसाठा कमी झाल्यामुळे माती उपसा जोरात चालू आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हि माती वीटभट्टीला विकण्याचा सपाटा काही मातीसाम्राटांनी लावला असल्याने भविष्यात मोठी समस्या उभी राहणार आहे.

घोड धरणात मोठया प्रमाणात काळी माती उपलब्ध असून गोलेगाव, निमोणे, शिंदोडी, चिंचणी या गावातील अनेक शेतकरी स्वतःच्या शेतात माती टाकून जमीन सुपीक करत आहेत. परंतु, शेतीच्या नावाखाली मातीचा उपसा करुन तो दिवसा साठवून नंतर रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या वीटभट्टीला विकण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे अनेकवेळा हाणामाऱ्या झाल्या आहेत. काळी माती विकून झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक तरुण सध्या या व्यवसायात उतरले आहेत. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टींचा वापर करुन हे तरुण प्रसंगी एकमेकांची डोकी फोडायला पण तयार आहेत.

घोड धरणातील काळी माती शेतात टाकण्यासाठी कोणतीही रॉयल्टी नसतानाही घोड धरणात पुर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. ते सध्या शेतात माती उचलण्यास अटकाव करत असून शासनाने पुर्वी जमिनीचा मोबदला दिलेला असतानाही सध्या हे शेतकरी स्वतःच्या जमिनीतून माती उचलण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत आहेत. त्यामुळे वीटभट्टीला जाणारी माती बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या