महिला खासदाराचा टिक टॉक व्हिडीओ झाला व्हायरल...

Image may contain: 4 people, people smiling, people standing and indoor
नवी दिल्ली, ता. 29 मे 2019: पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षाकडून खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांचा एक टिक टॉक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मां यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावर मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां यांचा एक टिक टॉक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मिमी चक्रवर्ती यांचासह नुसरत जहां एका इंग्रजी गाण्यावर थिरकाताना दिसत आहे. दरम्यान दोघींनी ही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून दोघीही अत्यंत ग्लॅमर अंदाजात दिसत आहेत. ‘बंगालाच्या नव्या खासदार. मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहां. भारताची प्रगती होत आहे. भारताच्या या महिला खासदांचे चित्र डोळ्यांना सुखावणारे आहे’ असे ट्विटमध्ये लिहिले होते.

याआधी नुसरत जहां यांनी संसदे बाहेर काढलेल्या एका फोटोमुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. नुसरत यांनी संसदेच्या पहिल्या दिवशी संसदेच्या बाहेर उभे राहून काढलेला फोटो इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केला होता. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी त्यांची थट्टा उडवली होती. संसदेच्या सभासद म्हणून त्यांनी योग्य वेशभूषा केलेली नाही असेही त्यांना म्हटले जात आहे.

मिमी यांनी देखील संसदेबाहेरचा एक फोटो त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला असून त्यामध्ये त्यांनी जीन्स,पांढरा शर्ट घातला आहे. या फोटोवर अनेकांनी “ही चित्रपटाच्या शूटिंगची जागा नाही” अशी प्रतिक्रिया दिली. एका नागरिकाने असेही म्हटले आहे की,”तुम्ही अशी नाटके करण्यासाठी संसदेत गेला आहेत का ? कृपया असे वागून बंगाल राज्याला लाजवू नका.”

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या