संसद भेटीच्या पहिल्याच दिवशी 'या' खासदार ट्रोल

Image may contain: 2 people, people smiling, people standing and sunglasses
नवी दिल्ली, ता. 30 मे 2019 : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या सध्याच्या घडीला राजकीय विश्वात अनेकांचं लक्ष वेधत असून, संसदेतील भेटीच्या पहिल्या दिवशीच त्या कपड्यांवरून ट्रोल झाल्या आहेत.

मिमी आणि नुसरत यांनी सोशल मीडियावर संसदेतील त्यांच्या पहिल्या दिवसाचे फोटो पोस्ट केले. लोकसभा निवडणुकांनंतर संसदेत जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. या खास दिवसासाठी त्यांनी खास स्टाईल स्टेमेंट ठेवत पाश्चिमात्य वेशभूषेला प्राधान्य दिले होते. पण, ही बाब मात्र अनेकांना खटकली. किंबहुना अनेकांनीच त्याविषयी नाराजीही व्यक्त केली.

जादवपूर मतदार संघातून तृणमूलकडून निवडून आलेल्या मिमी चक्रवर्ती यांनी पांढरा शर्ट आणि जीन्स, तर बसिरहाटमधून निवडून आलेल्या नुसरत जहाँ यांनी महरुनी रंगाच्या पेप्लम झिप टॉप आणि पँटला प्राधान्य दिलं होतं. सहसा संसदेत येणाऱ्या सेलिब्रिटींनी अनेकदा भारतीय वेशभूषेला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, पश्चिम बंगालच्या विजयी उमेदवारांचा अंदाज मात्र सर्वांहून वेगळाच ठरला. ज्यामुळे, 'हे संसद आहे, फोटोशूटची जागा नव्हे' असं म्हणज काही नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर घेतले.

'कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे कपडे घालून जावं हे तुम्हाला ठाऊक नाही. ही एक सरकारी कामाची जागा आहे, फोटोशूटचं ठिकाण नव्हे....', 'तुम्ही तिथे गेलेल्या पर्यटकांसारखे दिसत आहात', अशा असंख्य कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. तेव्हा आता साडी नेसण्याचा सल्ला देणाऱ्या नेटकऱ्यांचं म्हणणं त्या किती मनावर घेतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

कपड्यांवरुन खिल्ली उडवणारे रिकामटेकडे: मिमी चक्रवर्ती
लोकसभेच्या निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसदेला भेट दिली. यावेळी पाश्चिमात्य कपड्यांना प्राधान्य दिल्यामुळे, वेशभूषेच्या कारणावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.

सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्लीही उडवण्यात आली. पण, मिमी यांनी या सर्व ट्रोल्स आणि खिल्ली उडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. मी काही बोलण्यापेक्षा कृती करण्यावर विश्वास ठेवते, असं सूचक विधान त्यांनी केलं.

सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवणारे रिकामटेकडे आहेत, त्यांच्याकडे दुसरे कोणतेच काम नाही. ज्यावेळी एक महिला खासदार तिच्या कपड्यांच्या निवडीवरुन चर्चेचा विषय ठरते अशा वेळी महिला सबलीकरणाविषयी बोलणं वायफळ. सर्वजण समानतेची चर्चा करतात. पण, त्यांनाच बदल पाहणं मात्र कठीण वाटतं', असे मिमी म्हणाल्या.

बदल पाहण्याची मानसिकता अद्यापही जनसामान्यांत सरावलेली नाही, असं सांगणाऱ्या मिमी यांनी २०१९ या वर्षी लोकसभेत महिलांची संख्या जास्त असण्याची बाब अधोरेखित करत याविषयी आनंदही व्यक्त केला. आपल्यावर होणाऱ्या टीकता पाहता सध्याच्या घडीला त्याकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या राजकीय कारकिर्दीकडे आशावादी नजरेने पाहत असल्याचं मिमी यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात आपल्याला नेमकं कोणत्या विषयावर काम करायचं आहे, हे निर्धारित केल्याचंही ती म्हणाली.

का उडवण्यात आली होती खिल्ली?
मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसद भेटीच्या पहिल्याच दिवशी सर्वाचं लक्ष वेधले होते. पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसलेल्या या दोन्ही खासदारांनी अनेकांचे लक्ष वेधले. नेटिझन्सनची त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मिमी यांनी ट्विटरवर संसदेबाहेरील फोटो पोस्ट केल्यानंतर याविषयीच्या चर्चांनी जोर धरला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या