आम्हाला तुझी सुपारी मिळाली आहे... म्हणून लुटणाऱयांना अटक

Image may contain: one or more people and people sitting
शिरूर, ता. 1 जून 2019: "आम्हाला तुझी सुपारी मिळाली आहे असे सांगून, आताच्या आता तुझ्याकडे असतील तेवढे पैसे दे नाहीतर तुझं काही खरं नाही" असे म्हणून लुटणाऱया पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आदिनाथ उर्फ बाळू भिकाजी रेपाळे (रा. पुणेवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, प्रशांत उर्फ परश्या सुरेश गंगावणे (वय 21, रा. भानोबा कोयाळी, गंगावणे वस्ती, ता खेड, आरिफ हुसेन शेख (वय 19, रा. मलठण फाटा, शिक्रापूर, ता शिरूर, सुरज उर्फ बकासुर राजेश पाडळे (वय 21, रा. सोने सांगवी, ता शिरूर) यांना सापळा रचून पकडले.

या प्रकरणी निलेश अनिल भाले (वय 25, रा. मांजरी बुद्रुक, ता हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी अर्जुन सोमनाथ मोरे याने आळंदी फाटा, लोणीकंद येथे बोलावून फिर्यादीस त्याची लाल रंगाची मोटार (क्र. MH 12 GK 6836) मध्ये बसवून इतर चार साथीदारांच्या मदतीने शिक्रापूर गावचे हद्दीत नेऊन "आम्हाला तुझी सुपारी मिळाली आहे असे सांगून, आताच्या आता तुझ्याकडे असतील तेवढे पैसे दे नाहीतर तुझं काही खरं नाही" असे म्हणून फिर्यादीचे त्याच्या संमतीशिवाय, लबाडीने, मारहाण शिवीगाळ करून, धारदार हत्यारांचा धाक दाखवून त्याचे एटीएम मधून फिर्यादी जवळील 10 हजार रुपये काढून घेतले. अशी तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी जाऊन फिर्यादीने सांगितलेप्रमाणे त्या ठिकाणचा कसून तपास केला. गुप्त बातमीदारांच्या मदतीने शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील औरा सिटी सोसायटी, तळेगाव ढमढेरे रोड, A-12 बिल्डिंग मधील फ्लॅट नं 103 मधून आरोपी अर्जुन मोरे याला त्याने गुन्हा करताना धाक दाखवण्यासाठी वापरलेल्या तलवार, कोयता, चाकू या धारदार हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात परिसरामध्ये चौकशी केल्यानंतर चार साथीदारांनाही सापळा रचून पकडण्यात यश आले आहे. या आरोपींकडून गुन्ह्यातील मुद्देमाल 10 हजार रुपये रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व लाल रंगाची एस्टार मोटार (क्र. MH 12 GK 6836) जप्त करण्यात आली.

संशयीत आरोपी अर्जुन मोरे याचेवर शिक्रापूर पोलिस ठाणे हदर्दीत अशाच प्रकारचा बेकायदा हत्यारे बाळगले प्रकरणी एक गुन्हा दाखल आहे. संशयीत आरोपींनी गुन्ह्याबाबत कबुली दिली असून, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी, डॉ. सई भोरे-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत यांनी गुन्हे शोध पथकाच्या मदतीने या आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिस उप निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होणमाने, ऋषीकेश व्यवहारे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी डॉ. सई भोरे-पाटील या करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या