शिरूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी (Video)

Image may contain: car and outdoor
शिरूर, ता. 8 जून 2019: शिरूर तालुक्‍यातील विविध भागांत शुक्रवारी (ता. 7) सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शिक्रापूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणी झाले होते. पावसामुळे शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.

पूर्व भागातील रांजणगाव सांडस, आलेगाव पागा, उरळगाव, दहिवडी, पारोडी, अरणगाव, नागरगाव, वडगाव रासाई आदि गावात शुक्रवारी सायंकाळी 5 नंतर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक झाडे पडली असून शेतातील ऊस, उन्हाळी बाजरी, कडवळ, मका आदी पिके जमीन दोस्त झाली आहेत. परिसरात मोठे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाकडून पंचनामे करून शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. विजेचे खांब जमीन दोस्त झाल्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आहे. मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्याने खरीप पिकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.


शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये गारांसह पाऊस
शिरूर, ता. 3 जून 2019 : शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये रविवारी (ता. 2) सायंकाळी गारांसह पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रविवारी सायंकाळी ढग दाटून आल्यानंतर गारांसह पावसाला सुरवात झाली. रांजणगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गारा पडल्या. गारांसह पडलेल्या पावसामुळे वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांनी पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला. पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये अद्यापही पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. शिरूर शहरावरही पाण्याचे संकट आहे. यामुळे पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

महाराष्ट्रासह देशभरात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. राज्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घामाघूम करणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


3 आणि 4 जून रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने सांगितले आहे. तसेच मराठवाड्यात हवामान कोरडे राहील, असेही म्हटले आहे. 5 जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. 6 जून रोजी कोकण, गोव्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या