...म्हणून सलमानने बॉडीगार्डच्या लगावली कानशिलात!

Image may contain: 8 people, people smiling, people standing and indoor

मुंबई, ता. 6 जून 2019 : मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये अभिनेता सलमान खान याने एका बॉडीगार्डच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कारण होते एका लहान मुलाला बॉडीगार्डने धक्का दिल्याचे.

अभिनेता सलमान खानचा भारत हा चित्रपट ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. मुंबईतील लोअर परळच्या पीव्हीआरमध्ये सलमान भारतच्या प्रीमियर शोसाठी मंगळवारी (ता. 4) रात्री आला होता. शोनंतर चाहत्यांनी सलमानला भेटण्यासाठी आग्रह धरला. सलमानच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी त्याच्या बॉडीगार्डचा एका लहान मुलाला धक्का दिला. हे पाहून संतापलेल्या सलमानने थेट बॉडीगार्डच्या कानाखाली लगावली.

दरम्यान, नेहमीच वादात राहणाऱ्या सलमानने बॉडीगार्डला केलेली मारहाण पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चाही नेटिझन्सनी व्यक्त केली आहे. शिवाय, हा बॉडीगार्ड शेरा असल्याचंही सोशल मीडियावर बोलले जात होतं. पण हा बॉडीगार्ड शेरा नसून दुसरा असल्याचे समोर आले आहे.


...असाही सलमानचा फॅन
सलमानचे चाहत्यांची संख्या मोठी आहे. एका चाहत्याने चित्रपट पाहण्यासाठी अख्खं थिएटरचं बुक केले. नाशिकमधील आशिष सिंघल असे या चाहत्याचे नाव आहे. आशिष सलमानचे सगळे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आलेला भाईजानचा भारत मुव्ही फर्स्ट डे, फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर हे पूर्ण थिएटरच त्याने बुक केले आहे. सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे. ज्यादिवशी सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या