ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द

Image may contain: one or more peopleनवी दिल्ली, ता. 19 जून 2019: वाहन चालकाचा परवाना काढण्यासाठी आठवी पासची अट होती. परंतु, सरकारने ही अट रद्द केल्यामुळे कोणतीही व्यक्ती वाहन चालकाचा परवाना काढू शकतो. अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.

समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही. कारण, वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी सरकारने 8 वी पास असणे बंधनकारक केले होते. मात्र, नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे, यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेली व्यक्तीही ड्रायव्हींग लायसन्स म्हणजेच, वाहनचालक परवाना काढण्यास पात्र ठरणार आहे. देशातील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सद्यस्थितीत 22 लाखांपेक्षा अधिक ड्रायव्हरांची गरज आहे. त्यामुळे, दूरदृष्टी आणि रोजगार याचा विचार करुन गडकरींच्या अधिपत्याखाली दळणवळण मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत, खुद्द नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमावली 1989 या कायद्यात सुधारणा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरींच्या या निर्णयामुळे अशिक्षीत किंवा अडाणी व्यक्तीलाही वाहनचालकाचा परवाना काढता येईल. त्यामुळे बेरोजगारांना चांगली संधी आहे. दरम्यान, ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी देशात 2 लाख स्कील सेंटरही उभारण्यात येणार आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या