वाबळेवाडीमधील आंतरराष्ट्रीय शाळेने रचला इतिहास

जिल्ह्यात सर्वाधिक पात्र  विद्यार्थी संख्येचा रचला इतिहास, ५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

Image may contain: one or more people
वाबळेवाडी, ता. 21 जून 2019 : येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे ४७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वाबळेवाडी-शिक्रापूर (ता. शिरूर) येथील आंतरराष्ट्रीय शाळेने पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील दणदणीत यश मिळविले असून, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पात्र विद्यार्थी संख्येचा इतिहास रचला आहे.

पूर्व माध्यमिक  शिष्यवृत्ती परीक्षेत ३४ तर माध्यमिक  शिष्यवृत्ती परीक्षेत १३ असे एकूण ४७ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत झळकले असून त्यातील ५ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे :
राज्य गुणवत्ता यादीतील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक :-
प्रणव प्रकाश मांढरे (२८२ गुण, राज्यात सातवा), पार्थ बापू डफळ (२८० गुण, राज्यात आठवा ), प्रज्ज्वल पोपट वनवे (२८० गुण, राज्यात आठवा), अपेक्षा निलेश मासळकर (२७८ गुण, राज्यात नववा), पल्लवी पंडित देवकर (२७८ गुण, राज्यात नववा). जिल्हा गुणवत्ता यादी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीधारक :- वेदांत कुंडलिक वाबळे (२७६), अथर्व रवींद्र डफळ (२७४), हर्षदा प्रकाश वाबळे (२७०), ओम दिनेश पुजारी (२६८), राजवर्धन सुहास सूर्यवंशी (२६२), तनिष्का संतोष तांबे (२६०), राजवर्धन तुकाराम शिरसाट (२५८), ओम महारुद्र काळे (२५६), सृष्टी अविनाश शेवाळे (२५६), श्रेया बाबाजी राऊत (२५६), जीवन नितीन नरके (२५६), अस्मिता ज्ञानेश्वर तांबे (२५२), किरण भाऊसाहेब तांबे (२४३), वेदांत सुहास सोनवणे (२४२), आर्या महेश शिरसाट (२४०), अथर्व गणेश टेमगिरे (२३८), परेश राजेंद्र डफळ (२३८), इस्माईल पापाभाई शेख (२३८), अनुष्का मंगेश खैरे (२३८), संचाली बंडू पिंगळे (२३६), श्रावणी बापूसो जाधव (२३४), यश वसुदेव जाधव (२३०), पायल अरुण ठोंबरे (२२८), संस्कृती शंकर पावसे (२२२), अनुराधा संतोष यादव (२२२), मैथिली दत्तात्रेय बारगळ (२२२), ओम दयानंद कोरे (२२२), आशितोष भाऊसाहेब वाघ (२२२), नम्रता नामदेव राऊत (२२०).

जिल्हा गुणवत्ता यादी माध्यमिक शिष्यवृत्तीधारक :-
प्रतिक्षा बापूसाहेब वाबळे, अंजली प्रकाश बांगर, अनन्या नवनाथ चातुर, सानिका सतिश रुके, आदित्य रमेश वाबळे, आशुतोष बाळासाहेब वाबळे, सिद्धी अरुण वाबळे, प्रियांका लहु पोतले, श्रावणी नितीन सात्रस, अभिषेक ज्ञानेश्वर रणपिसे, मनोज बसवराज चिनगुंडे, सानिका यशवंत वाबळे, प्रणाली संतोष भोसुरे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जयश्री पलांडे, सुनील पलांडे व संदीप गीते यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाबळे, मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे, केंद्रप्रमुख रत्नमाला मोरे, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या