...अन् क्षणात होत्याचे नव्हते झाले

Image may contain: 1 person, smiling, standing and close-upनिर्वी,ता.२४ जुन २०१९(प्रतिनीधी) : अचानक आकाशात ढग जमा झाले..काहीक्षणात पाउस पडणार असे वाटु लागले.शेतात काम करताना  वीज चमकली अन क्षणात काळाने त्याच्यावर झडप घातली.

निर्वी(ता.शिरुर) येथे रविवार(दि.२४) रोजी दुपारनंतर घडलेली दुर्दैवी घटना.या दुर्दैवी घटनेत अक्षय पवार(वय.२०) याचा वीज पडुन रविवारी मृत्यु झाला.रविवारी दुपारनंतर आकाशात अचानक ढगांची दाटी झाली.पाउस पडण्याची चिन्हे दिसु लागल्यानंतर शेतात काम करणा-या पवार कुटुंबाने लागलीच घराकडे धाव घेतली.दरम्यान मागे राहिलेल्या आकाशवर अचानक विज कोसळली.कुटुंबियांना ही बाब समजताच कुटुंबियांनी धाव घेत जखमी अक्षयला नजीकच्या दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले माञ तत्पुर्वीच अक्षय चा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Image may contain: one or more people, tree, child and outdoorअक्षय हा अत्यंत शांत स्वभावाचा,मनमिळावु असा सर्वांना परिचित होता.निर्वी,शिरसगाव,धुमाळवाडी परिसरात वार्ता कळताच शोककळा पसरली असुन सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या