शिरुरला भरदुपारी रंगले एसटीचे थरारनाट्य...

Image may contain: 1 person, smiling, outdoorशिरूर, ता.२८ जुन २०१९ (मुकुंद ढोबळे) : दुपारची वेळ.. बसस्थानकातुन नेहमीप्रमाणे निघालेली बस..माञ न थांबता तशीच वेगाने पुढे जाउ लागते अन क्षणात वेगवेगळ्या गाड्यांना धडक बसते..हे घडत असताना माञ अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो.

हे थरारनाट्य गुरुवारी दुपारी पहायला मिळाले शिरुर बसस्थानकाजवळ.शिरूर एसटी बस स्थानकातून निघालेल्या बस चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटल्याने झालेल्या एसटीची बसस्थानकानजीक जाणा-या  दुचाकी गाड्याना व  तीन चार चाकी वाहनांना धडक बसली.या वेळी चार जण गंभीर जखमी झाले आहे.या अपघातात रस्त्यावर असणाऱ्या एका टेम्पो मुळे बस जागेवर थांबली अन्यथा पुणे येथे झालेल्या संतोष माने अपघातांची पुनरावृत्ती टळली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती.

या अपघातात शिवकुमार चंद्रकांत घोंगडे, विशाल अशोक वाघमारे, लहान मुलगी साईशा विशाल वाघमारे,कविता अशोक ईश्वरे  (सर्व रा.शिरूर) हे चार जण जखमी झाले आहेत.याबाबत शिवकुमार चंद्रकांत घोंगडे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.याप्रकरणी एसटी बस चालक गाडीलकर पुर्ण नाव माहीत नाही याच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी दीडच्या दरम्यान शिवराज धोंगडे हे आपले बँकेतील काम उरकून पुन्हा घराकडे मुंबई बाजार येथे निघाले असता एस टी स्टँड जवळ आले असता स्प्लेंडर गाडी क्रमांक (एम.एच.२०.सी.आर.७८३३) हिला एसटी बस स्थानकातून निघणाऱ्या भरधाव वेगातील एसटी बसने जोरदार धडक देऊन रस्त्यात असणाऱ्या आणखी एका स्प्लेंडर गाडी ला व ओमिनी गाडी (एम.एच.१७ ए.जे.५६५९),एक दुचाकी युनिकॉर्न गाडी ला धडक दिली. त्यानंतर एसटी बस तशीच पुढे जाऊन एका टेम्पोवर जाऊन आदळुन थांबली. या अपघातामध्ये वरील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गाडीचे ही नुकसान झाले आहे. शिरूर पोलीस स्टेशन येथे शिव कुमार घोगडे यांनी फिर्याद दिली असून एसटी चालक गाडीलकर पूर्ण नाव माहिती नाही यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरुर पोलीस करत आहे.

शिरूर एसटी बस स्थानका समोर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते.तसेच फळांची दुकाने याच भागात असुन अत्यंत वर्दळीचे ठिकाण असल्याने नागरिकांची कायम गर्दी येथे पहायला मिळते.शिरूर एसटी बसस्थानकातून निघणाऱ्या या एसटी बसने भरधाव वेगात चार ते पाच गाड्यांना धडक दिल्या नंतर जर समोर तो टेम्पो नसता तर एसटी बस असेच या वर्दळीच्या रस्त्यावरून जाऊन मोठा अपघात झाला असता माञ  दैव बलवत्तर म्हणून अपघातात कोणासही जीवास मुकावे लागले नाही.मोठा अपघात केवळ टेम्पो मुळे टळला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या