शिरूर तालुक्यात संततधार पाऊस; शेतकरी सुखावले

Image may contain: outdoor and water
शिरूर, ता. 30 जून 2019: शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पावसामुळे बळीराजा सुखावला असून, खरीप व रब्बीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याने परीसरातील शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले आहे.

शिरूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे. तालुक्यातील विविध भागांमध्ये दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्त्यावर पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. कांही ठिकाणी शेतातील वाफ्यांना तळयाचे स्वरूप आले आहे. मान्सूनचे दमदार आगमन झाल्याने परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पावसामुळे पिण्यासह जणावरांचा चाऱयाचा प्रश्न मिटणार आहे. शेतकरी शेताच्या कामाकडे वळल्याचे चित्र तालुकाभर दिसत आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या