जमीन घोटाळयातील महिला अधिकारी गरड निलंबित

Image may contain: 1 person, standing
शिरूर, ता. 5 जुलै 2019: शिरूर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची शासकीय जमीनींची बेकायदेशीरपणे हस्तांतरण करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी नायब तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड (मुळीक) यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात 6 फेब्रुवारी 2019 रोजी पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गरड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती व न्यायालयाकडून पोलिस कोठडी देण्यात आली होती, गरड या जामीनावर सुटताच काही दिवसांनी लगेच ह'म'परिमंडल कार्यालयात थेट रूजू झाल्या होत्या. सदर कार्यालयात त्या शासकीय कामकाज व रेशनिंग कार्डाचे काम करत असल्याचे दिसून आले. ह'म' परिमंडल कार्यालयातील अधिकारी 48 तासापेक्षा जास्त पोलिस कोठडीत असताना कार्यभार काढायचा वरिष्ठांना पडला विसर. या शिर्षकाखाली बातमी 'सजग नागरिक टाईम्स'ने प्रसिद्ध केली होती. शिवाय, पाठपुरावा सुरू ठेवला होता. या वृत्ताची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी तसा अहवाल त्यांच्या वरिष्ठांना पाठविला त्यात ह'म'परिमंडल अधिकारी तथा नायब तहसीलदार गीतांजली गरड या दोषी आढळल्याने त्यांना अखेर निलंबित (suspended) करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या