रांजणगावातील अपघातात एकजण जागीच ठार (Photo)

Image may contain: outdoorरांजणगाव गणपती, ता. 6 जुलै 2019: पुणे-नगर रस्त्यावरील अष्टविनायक महागणपती मंदिरासमोर दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (ता. 5) पहाटे हा अपघात झाला.

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथे पुणे-नगर रस्त्यावर महागणपती मंदिरासमोर दोन मोठ्या मालवाहतूक करणाऱया कंटेनरची समोरा समोर धडक होवून भीषण अपघात झाला. या अपघातात वाहन चालक बाबाजी हरिभाऊ गर्जे (वय 34,रा.आष्टी) हे जागीच मृत्युमुखी पडले तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एम.एच.23 डब्ल्यू 7625 या क्रमांकाचे जड वाहन पुण्याहून अहमदनगरच्या दिशेने जात असताना नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेले वाहन क्रमांक डब्ल्यू बी.19,जी 8151 या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरच्या कंटेनरवर जोरात धडकल्याने पुण्याहून नगरकडे चाललेल्या वाहनाचा चालक जागीच ठार झाला तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचा पुढील तपास रांजणगाव पोलिस करीत आहेत.

पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक ठप्प...

पुणे-नगर रस्त्यावर शिरूर तालुक्‍यातील चोविसावा मैल याठिकाणी शुक्रवारी दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. यामध्ये प्रवाशी, विद्यार्थी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. कासारी फाट्यापासून चोविसावा मैलमार्गाने पुढे शिक्रापूरपर्यंत वाहतूक कोंडी अधिकच त्रासदायक ठरणारी होती. नगरहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. एकाच बाजूने वाहनांच्या तीन लाइन झाल्याने वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली. शिक्रापूर चौकात वाहतूक कोंडी झाल्याने कासारी फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक वाहन चालक पुढे जाण्यासाठी धडपड करण्याच्या नादात आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली. पुणे-नगर रस्त्यावर वाहतूक कोंडीत वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या