स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे "जान्हवी" आईच्या कुशीत

Image may contain: 12 people, people smiling, people standingपुणे,ता.६ जुलै २०१९(प्रतिनीधी) : पळवुन नेलेल्या दिड वर्षाच्या जान्हवी हि चिमकुली अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांच्या तत्परतेमुळे आईच्या कुशीत सुखरुप विसावली.

याबाबत पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी माहिती देताना सांगितले कि, (दि.३१.५.२०१९) रोजी लिला उर्फ सुरेखा विनोद भैसारे(रा.खोमणे आळी,जेजुरी,ता.पुरंदर) नातेवाईकांच्या अत्यंविधीस जात असताना जेजुरी बसस्थानकातुन  यांची लहान मुलगी जान्हवी(वय.दिड वर्ष) हिला अज्ञात व्यक्तीने पळवुन नेले होते.याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली होती.या घटनेचे गांभिर्य व संवेदनशीलता ओळखुन वरिष्ठांनी गुन्हे शाखेला गुन्हयातील आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार,गुन्हे शाखेचे प्रमुख पद्मकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींना शोधण्यासाठी तपासचक्रे वेगाने फिरवत तपास सुरु केला.तपास पथकाने ठिकठिकाणी तपास करत जेजुरी बसस्थानक व जेजुरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.या वेळी तपासादरम्यान संशयित आरोपीचा शोध घेत पल्सर गाडीवरील व्यक्तीची माहिती घेत संशयित आरोपी सागर पांडुरंग खरात(मुळ रा.माळेगाव बुद्रुक,ता.बारामती सध्या रा.कोलवडी,ता.हवेली) यास हडपसर येथुन ताब्यात घेतले.यावेळी कसुन तपास केला असता अपह्रत मुलगी जान्हवीस पत्नी जवळ ठेवले असल्याचे पोलीसांना सांगितले.त्यानंतर पोलीसांनी कोलवडी येथुन जान्हवीस ताब्यात घेउन सुटका केली.आरोपीने गुन्हयाची कबुली देत लग्नहोउन मुलबाळ होत नसल्याने मुलीस पळवुन नेल्याचे सांगितले.

या गुन्हयाचा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पद्मकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोंगडे, सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर,पोलीस हवालदार चंद्रकांत झेंडे,मोरेश्वर इनामदार,राजु मोमीन,राजु पुणेकर,महेश गायकवाड, निलेश कदम,सचिन गायकवाड,प्रमोद नवले, महिला पोलीस हवालदार पुनम कांबळे यांनी हि कामगिरी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या