बोरदरा शाळेत विदयार्थ्यांना दप्तरे वाटप

निमोणे,ता.६ जुलै २०१९(प्रतिनीधी) : बोरदरा(ता.खेड) येथे इको पॅकेजिंग कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तरे वाटप करण्यात आल्याची माहिती उद्योजक रोहिदास काळे यांनी दिली.

सामाजिक बांधिलकी म्हणुन इको पॅकेजिंग च्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.यावर्षी खेड तालुक्यातील बोरदरा व पिंपरी खुर्द या दोन जि.प.प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तरे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी जि.प.सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी बोलताना गावातील मंदिरांवर होणा-या अफाट खर्चाबरोबरच ज्ञान मंदिरांवर खर्च करावा असे आवाहन केले.अभिनेते अमोल थोरात यांनी युवा पिढी सक्षमपणे घडवायची असेल तर जि.प शाळेतील विदयार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आग्रही असावेच परंतु समाजातील जाणकारांनीही यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.या वेळी सतोष काळे यांनी उपक्रमशील शाळेची व स्वत: राबवत असलेल्या अनोख्या उपक्रमांची माहिती दिली.

या प्रसंगी बोरदराचे सरपंच किरण पडवळ,उपसरपंच संदिप साळुंके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश साळुंके, सोसायटीचे चेअरमन नवनाथ काळे,उद्योजक प्रकाश पडवळ,काळुराम पिंजण, गणपत काळे,हर्षद पडवळ,कृष्णाबाई पडवळ,दत्ता पडवळ, अरुण पडवळ,दिपक साळुंके,जालिंदर पडवळ,बारकु पडवळ, हरिभाऊ पडवळ,तांबे सर, ठाकुर, सोनवणे यांसह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.इको पॅकेजिंग चे रोहिदास काळे, गणपत काळे,नेञानंद गुप्ता, किसन गावडे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या