शिरुरला पारधी समाजाचे अर्धनग्न आंदोलन

Image may contain: 8 people, crowd and outdoorशिरुर,ता.७ जुलै २०१९(प्रतिनिधी): मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील ग्रामपंचायत व महसूल विभागामध्ये शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून याच्या निषेधार्थ शिरूर कार्यालयावर मांडवगण फराटा येथील पारधी समाजाच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

शिरूर तहसील कार्यालय समोर मांडवगण फराटा येथील हिरालाल रामा भोसले  यांनी परिवारासह गेल्या अकरा दिवसांपासून विविध मागण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.घोटाळा करणारे अधिकारी,कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

या ठिय्या आंदोलनास पारधी समाजाच्या वतीने मोर्चा बोंबाबोंब ,अर्धनग्न आंदोलन करून पाठिंबा दिला.मांडवगण फराटा येथे दारिद्र खालील यादीमध्ये धनदांडग्या लोकांना समाविष्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. तर असे पन्नास कुटुंब आहे ज्यांना दारिद्र्यरेषेखाली यादीमध्ये समाविष्ट करावे,मांडवगण फराटा ग्रामपंचायतीमध्ये इंदिरा आवास योजना,घरकुल योजना,  अपंगांच्या योजना यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करण्यात आला आहे.

मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी अंगणवाडी सेविका यांनी आपली नावे दारिद्र्यरेषेचे मध्ये समाविष्ट केली व घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे यांनी विविध योजनांमध्ये शासनाची फसवणूक  केल्याने या प्रकरणाची चौकशी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतीच्या जिल्हा परिषद शाळा व पी डब्ल्यू हद्दीत टपऱ्या व गाड्यांच्या नोंदी रद्द करून अतिक्रमणे हटवणे,मांडवगण फराटा येथील कोतवाल यांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रमण गायरान हद्दीतील बेकायदेशीर बांधकाम हटविण्यात यावे,अपंग नागरिकांना सवलतीत ग्रामपंचायत मध्ये गाळे देणे,हिंदू पारधी समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी अधिकारी पैशाची मागणी करत आहे.त्यांची चौकशी करणे,मांडवगण फराटा येथील फासेपारधी समाजातील लोकांना रेशनिंग कार्ड मिळावे, मांडवगण फराटा येथे सुरू असलेले अनधिकृत अवैद्य धंदे मटका,कॉम्प्युटर लॉटरी,  धाब्यावर अवैधरित्या सुरू असलेले दारू विक्री,बंद करावी अशा एकूण 40 मागण्यांसाठी  गेली 11 दिवसापासून हिरालाल रामा भोसले यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असे त्यांनी सांगितले.

शिरुर  शहरातील  इंदिरा गांधी पुतळा यांना पुष्पहार घालून पारधी समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा शिरूर तहसीलदार कार्यालय येथे  गेल्यावर हे पारधी समाजातील पुरुष नागरिकांनी अर्धनग्न होऊन आंदोलन करून पारधी समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी बोंबाबोंब आंदोलनही केले.यावेळी  शिरूरचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना पारधी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आली. लवकरात लवकर मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली.यावेळी पारधी समाजातील संजय पवार, नामदेव काळे,सतीश भोसले,अंगण चव्हाण,पवन चव्हाण,सर्जन पवार,मँनेजर भोसले आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या