मंगलदास बांदल यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Image may contain: 1 person, smiling
शिरूर, ता. 9 जुलै 2019: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह तिघांविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. 8) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशा किसन पाचर्णे (सध्या रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे. मूळ रा. तर्डोबाची वाडी, ता. शिरूर) यांनी जमीन व्यवहारातील फसवणूकप्रकरणी व जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

जानेवारी 2008 मध्ये पाचर्णे यांच्या आईलह दोन बहिणींच्या नावे असणाऱया तर्डोबाची वाडी येथील पाच एकर जमिनीचा व्यवहार (गट नं. 712 व 713) एक कोटी रुपयांना बांदल यांनी राहुल टाकळकर व दिगंबर टाकळकर या आपल्या मध्यस्थांमार्फत ठवला होता. इसार म्हणून पन्नास हजार रुपये पाचर्णे यांना दिले होते. खरेदी खताच्या वेळी दहा लाख रुपये दिले होते. त्याचबरोबर बारा लाखांचा धनादेशही दिला. मात्र, हा धनादेश वटला नाही.

दरम्यान, पाचर्णे यांनी बांदल यांच्याकडे उर्वरित रक्कमेसाठी तगादा लावला असता, बांदल यांनी त्यांना दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या या धमकीमुळेच पाचर्णे यांना पुण्यात वास्तव्यास जावे लागले. याप्रकरणी बांदल यांच्यासह दिगंबर गुलाब टाकळकर व राहुल वंसत टाकळकर (दोघे रा. हिवरे, ता. शिरूर), रामहरी शंकर दौंडकर (रा. करंजावणे, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या