विहिरीत पडलेला बिबट्या अलगद बाहेर (Video)

No photo description available.
फाकटे, ता. 15 जुलै 2019: येथील गावडे वस्तीवर असलेल्या एका विहिरीत पडलेला बिबट्याला वनविभागाने अलगद बाहेर काढले अन् पिंजऱयात जेरबंद केले.

गावात असलेल्या गावडेवस्तीवरील रामदास काशिनाथ भालेकर यांच्या विहिरीत रविवारी (ता. 14) पहाटे बिबट्या पडला होता. त्याने बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. याबाबतची माहिती वनविभागाला समजल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाने पिंजरा विहिरीत सोडला. दमलेल्या बिबट्याने तत्काळ पिंजऱयात प्रवेश केला अन् वनविभागाने पिंजऱयाचा दरवाजा बंद केला. यामुळे बिबट्या अलगद जेरबंद झाला. संबंधित घटना मोबाईलमध्ये कैद झाली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या