"निमोणे आयडॉल्स" ग्रुपची सामाजिक कार्यातुन बांधिलकी

Image may contain: 1 person, standingनिमोणे,ता.१५ जुलै २०१९(प्रतिनीधी) : निमोणे आयडॉल्स हा व्हॉट्सअप ग्रुप हा केवळ संवादाचे माध्यम न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा ग्रुप आदर्श असुन या माध्यमातुन तालुक्यात नवा आदर्श निर्माण झाला असल्याचे गौरवोद्गार शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी काढले.

Image may contain: 2 peopleनिमोणे आयडॉल्स या व्हॉट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन निमोणे गाव व परिसरातील शाळांमधील गुणवंत विद्यार्थी व संस्था-व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी पालवे हे बोलत होते.निमोणे आयडॉल्स या व्हॉट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्याचे हे चौथे वर्ष आहे.

यावेळी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना पालवे म्हणाले कि, ग्रामीण भागातील विदयार्थ्यांनी ग्रामीण-शहरी असा मनात भेदभाव न मानता ध्येयाकडे वाटचाल करावी.ग्रामीण भागातील शाळा या गुणवत्तेबाबत अग्रेसर असुन ग्रामीण भागातुन जास्तीत जास्त अधिकारी घडावेत यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.निमोणे आयडॉल्सया ग्रुप च्या सामाजिक बांधिलकीचे यावेळी पालवे यांनी कौतुक केले.

प्रा.मयुर ओतारी यांनी बोलताना, शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना दिवसेंदिवस वाढणारं मोबाईल चं व्यसन हे घातक असुन विद्यार्थ्यांनी मोबाईल चा मर्यादित वापर करावा व ध्येयाकडे अधिकाधिक लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.

यावेळी यशस्वी उद्योजक रोहिदास काळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष काळे,आबासाहेब थोरात यांचा उल्लेखनीय कार्य व योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच बेबीताई भालेकर, धनंजय काळे, संजय काळे, चेअरमन दत्ता जाधव,श्रीधर जगताप, शामराव जगताप,दत्ताञय काळे,भरत काळे,डॉ.पुरुषोत्तम जगदाळे, प्रकाश दुर्गे, आर.के.काळे,गणेश भोस,पञकार बापु जाधव, निमोणे आयडॉल्सचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड, नवनाथ गव्हाणे,मच्छिंद्र बांदल,संतोष ढोरजकर, सुनिल चव्हाण,जयसिंग दोरगे, जालिंदर सातपुते,संतोष जगताप आदी उपस्थित होते.प्रफुल्ल सरवदे,संतोष काळे यांनी सुञसंचालन तर शामराव जगताप यांनी आभार मानले.

निमोणे आयडॉल्स हा व्हॉट्सअप ग्रुप गेल्या पाच वर्षांपासुन सोशल मिडियाच्या माध्यमातुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असुन गावातील विद्यार्थ्यांना विविध माध्यमातुन प्रोत्साहन देणे,गावातील युवक-आबालवृद्धांचा एकञितपणे वाढदिवस साजरा करणे, अडचणीतील तसेच गरजुंना मदत करणे असे विधायक उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातुन गेल्या चार वर्षांपासुन सातत्याने राबविले जात असुन संपुर्ण तालुक्यात या ग्रुपने नवा आदर्श निर्माण केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या