कामगाराची पहिल्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

No photo description available.रांजणगाव गणपती,ता.१५ जुलै २०१९ (प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमधील आयटीसी या कंपनीतील एका कामगाराने कंपनीच्या पहिल्या मजल्यावरुन ऊडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

अमित नानासाहेब चव्हाण (वय ३२,रा.सरुर,ता. वाई, जि.सातारा) असे मयत कामगाराचे नाव आहे.तर या प्रकरणी निलेश नरहरी करनेवार याने रांजणगाव पोलीसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,मयत अमित हे शनिवारी राञी राञपाळीसाठी कंपनीत कामावर आला असता रविवारी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी अमित चव्हाण याने अज्ञात कारणामुळे कंपनीतील पहिल्या मजल्यावर जाऊन खाली ऊडी मारुन आत्महत्या केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे या करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या