बांदलांवर दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ

Image may contain: 10 people, people smiling, people standingशिक्रापूर,ता.१६ जुलै २०१९(प्रतिनीधी) : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर शिरुर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल असताना जमीन खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा शिक्रापुर पोलीस स्टेशनला दाखल झाल्याने शिरुर तालुक्यात खळबळ माजली असुन तालुक्यासह जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे. 

याबाबत शिवसेनेच्या ग्राहक संरक्षण सेलचे उपजिल्हाप्रमुख किरण देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.किरण देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची २१ गुंठे शेती पुणे-नगर महामार्गावरील खंडाळे (ता.शिरूर) येथे होती. ती विकायची असल्याने याबाबत बांदल आणि देशमुख यांचेत २७ लाखांना व्यवहार ठरला. मात्र प्रत्यक्ष खरेदी खतावेळी श्रीकांत ज्ञानोबा विरोळे-पाटील व राहूल वसंत टाकळकर यांच्या नावाने खरेदीखत करुन देण्याबाबत बांदल यांनी देशमुख यांना सांगितले व दोन दिवसांनी पैसे देतो असे सांगितले. त्यानुसार सदर व्यवहार १९ मे २०१० मध्ये खरेदीखत झाले आणि देशमुख दि.२१ मे २०१० रोजी बांदल यांचेकडे गेले असता ते घरी नसल्याचे निदर्शनास आले. मग देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत पैशांबाबत खरेदीदार विरोळे-पाटील व या व्यवहारातील साक्षीदार राहूल टाकळकर यांचेकडे विचारणा सुरू केली तर या दोघांनीही दाद दिली नाही.


यात आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने देशमुख यांनी या प्रकरणी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर दोन दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांची पुण्यात भेट घेतल्यानंतर त्यांच्या सुचनेनुसार मंगलदास बांदल, श्रीकांत विरोळे-पाटील व राहूल टाकळकर यांचेवर सोमवारी (दि.१५) रात्री उशिरा फसवणूकीचा गुन्हा शिक्रापूर पोलिस स्टेशनला दाखल झाला.याबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार अधिक तपास करीत आहेत.

शिरुर पोलीस स्टेशनला अशाच एका व्यवहाराबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच दुसरा गुन्हा शिक्रापुर पोलीस स्टेशनला दाखल झाला.त्यामुळे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ माजली असुन ठिकठिकाणी चर्चांना उधान आले आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक यांनी कडक पविञा घेत गुन्हे दाखल केल्याने नागरिकांकडुन प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. या मुळे शिरुर-हवेलीतील राजकिय क्षेञात अनेकांचे धाबे दणाणले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या