अखेर त्या मुलांच्या हाती पाटी-पेन्सिल...

Image may contain: 18 people, people standing and indoorतळेगाव ढमढेरे,ता.१७ जुलै २०१९(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिक्षणापासून वंचित ऊसतोड कामगारांच्या शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना जि.प.प्राथमिक शाळेत दाखल करण्यात आले आहे.

शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे केंद्रातील धानोरे गावच्या परिसरातील  गुऱ्हाळावर कामानिमित आलेल्या ऊसतोड  कामगारांची अनेक मुले  शाळाबाह्य होती. शाळेचे मुख्याध्यापक शंकरराव शिंदे आणि सहशिक्षकांनी प्रत्यक्ष  गुऱ्हाळावर जाऊन त्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन अडचणी समजून घेतल्या आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगून शाळेत येण्यासाठी प्रवृत्त केले.

या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि विविध वयोगटातील ९ मुले शाळेत वयानुसार पहिली ते सातवीच्या वर्गात दाखल झाली. या सर्व मुलांना लेखन साहित्य, दप्तर, पुस्तके आदी शाळेमार्फत मोफत  पुरविण्यात आले. शाळेतील माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ  आणि नवीन साहित्य मिळाल्याने मुले खुश असून आनंददायी शिक्षण घेत आहेत.

भविष्यात मुलांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे शिक्षक  संभाजी भालेराव, नवनाथ भुजबळ, दत्तात्रय वडघुले, जयश्री वाळके, वैशाली कुंभार, मिनल ढवळे यांनी सांगितले. या  स्तुत्य उपक्रमाचे  केंद्रप्रमुख अनिल पलांडे  यांनी कौतुक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या