कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद

कोंढापुरी,ता.१७ जुलै २०१९(प्रतिनीधी) : कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनने देशी झाडांची लागवड करुन आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांनी व्यक्त केले.

Image may contain: 5 people, people smiling, people standingकोंढापुरी(ता.शिरुर) येथील कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशन यांच्या वतीने 1111 देशी (वड, पिंपळ, उंबर, बांबू,कवट, बेल,अंजन, लिंब, महारुख, आपटा, चिंच आदी)झाडांचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम व लोकसहभागातून गावातील तीन ओढयांचे साडेचार किलोमीटर खोलीकरण करून त्यावर एकूण 32 माती बंधारे तयार करण्यात आले आहेत.या जलसंधारण व वृक्षारोपणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पद्मभूषण अण्णासाहेब हजारे हे बोलत होते.
 
पुढे बोलताना ते म्हणाले कि,दिवसेंदिवस वातावरणातील ओझोन संपतोय, ऑक्सिजन संपतोय म्हणून  देशी 1111 झाडांची लागवड करून ग्रामविकास फाउंडेशनने एक आदर्श निर्माण केला आहे.कोंढापुरीतील ग्रामविकास च्या कामांनी भुरळ घातली असेही यावेळी अण्णासाहेब हजारे म्हणाले.

वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये बोलताना मनरेगाचे अधिक्षक विनयकुमार आवटे म्हणाले की,सरकार आपल्या दारी योजनांची खैरात घेऊन आहे,मात्र आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे व संवर्धन केले पाहिजे तरच आपल्याला जीवन जगणे सुखकर होईल.

या कार्यक्रमांमध्ये सामाजिक वनीकरण पुणे विभागाचे विभागीय वनाधिकारी दिलीप घोलप त्यांनी त्यांच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या कन्या वनसमृद्धी या योजनेअंतर्गत सामाजिक वनीकरण विभागामार्फत दहा वृक्षांचे गावातील या वर्षी जन्मलेल्या मुलीच्या कुटुंबाला वाटप करण्यात आले. या वेळी विभागीय वनअधिकारी दिलीप घोलप,तहसीलदार गुरु बिराजदार,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक गायकवाड,सोसायटी चेअरमन अशोक गायकवाड, संजय कडु, पोलीस पाटील राजेश गायकवाड, सरपंच नंदाताई ढसाळ, उपसरपंच आशिष गायकवाड,उदयोजक विनय गायकवाड गटशिक्षणाधिकारी लोंढे, सामाजिक वनीकरण शिरूर विभागाच्या तनुजा शेलार,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्प्रिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल, आर एम धारिवाल माध्यमिक विद्यालय, यांचे सर्व शिक्षक,कर्मचारी, विदयार्थी, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी चे सर्व प्रतिनिधी, औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक कोंढापुरी ग्रामविकास फाऊंडेशनचे समन्वयक धनंजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल दिघे यांनी केले तर आभार माजी सरपंच स्वप्नील गायकवाड यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या