Video : मस्ती माझी नाय तर तुमचीच जिरली...

Image may contain: 2 peopleशिरुर,ता.१९ जुलै २०१९(मुकुंद ढोबळे) : राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी माझ्यावर टिका करण्यापेक्षा स्वत:च्या मुलाला निवडुन नाही आणता आले.आपल्या मुलाच्या झालेल्या पराभवाने तोंड काळवंडले असुन मस्ती माझी नाही तर मस्ती तुमची जिरली आहे.असा घणाघात शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पञकार परिषदेत केला.

दोन दिवसांपुर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांकडे आढळराव पाटील यांच्या पराभवामुळे आढळराव यांची मस्ती जिरली अशी टिका केली होती.यावर प्रत्युतर देत शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरुर येथे पञकार परिषदेत अजित पवार यांच्यावर घणाघाती टिका केली.

यावेळी आढळराव पाटील बोलताना म्हणाले कि,राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्याकडुन माझ्यावर टिका केली.परंतु ज्यांच्या मुलाला मावळात निवडुन नाय आणता आलं त्यांनी माझ्यावर टिका करणे हा विनोद आहे.हे लक्षात ठेवा माझ्या शिवसेना पक्षाचे राज्यात 18 खासदार आहेत तुमच्या पक्षाच्या फक्त चार खासदार आहे.माझा पराभव झाला मान्य आहे परंतु जे निवडुन आले ते केवळ मालिकेमुळे निवडुन आले आहेत.पराभवानंतरही पक्षाने माझा योग्य सन्मान केला आहे हे लक्षात ठेवा असा इशारा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. पार्थ जर पडला तर मी राजकारणातुन निवृत्त होइन असे  वक्तव्य अजित पवार यांनी निवडणुकिदरम्यान केले होते. ह्या केवळ तोंडाच्या वाफा असुन घरचा पक्ष फोडणारा हा माणुस असल्याची टिका त्यांनी यावेळी केली.मी लोकांशी नम्र वागणारा माणुस असुन आव्हानात्मक भाषा मी कधी केली नाही.अहंकाराने कधी वागलो नाही.माझ्या पक्षात माझा चांगला सन्मान असुन माझ्या पराभवाची चिंता तुम्ही करु नये असेही ते म्हणाले.

मी माझ्या कार्यकाळात तळेगाव,चाकण आदी एमआयडीसीत सुमारे ७ ते ८ हजार तरुणांना नोक-या लावल्या असुन शिरूर लोकसभा मतदार संघातील नागरिक, शेतकरी, जनता,विद्यार्थी आजही माझ्याकडे त्यांचे वेगवेगळे प्रश्न व अडचणी सोडवण्यासाठी येत आहेत.मला पराभव महत्वाचा नाही तर जनेतेचे प्रश्न महत्वाचे आहेत.जनतेची सेवा आजही माझी जोमानं सुरु असल्याचे आढळराव यांनी सांगितले.मराठा मोर्चाला कलंकित करण्याचा डाव माजी आमदार दिलीप मोहिते यांनी रचला होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई होत असल्याचे त्यांनी सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल ज्यांनी जमीन व्यवहारात जे कृत्य केली त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. चुका तुम्ही करायच्या दंगली तुम्ही करायचे आणि गुन्हे दाखल झाले तर खासदार आढळराव-पाटील यांचे नाव घेता हे कुठल राजकारण आहे असा सवाल खासदार आढळराव पाटील यांनी केला.बैलगाडा शर्यत या मुद्दयावर मी ५ ते ६ वेळा लोकसभेत प्रश्न मांडला आहे.हा प्रश्न लोकसभेत मांडुन उपयोग होणार नाही.यात घटनात्मक पेच निर्माण झाल्यामुळे हा प्रलंबित आहे.मी यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिल असे बोलताना त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या