शिरसगाव काटात आढळला अनोळखी मृतदेह

शिरसगाव काटा,ता.२० जुलै २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा(ता.शिरुर) येथे पुरुषाचा अनोळखी आढळुन आल्याची घटना शनिवार(दि.२०) रोजी घडली.

याबाबत भाउसाहेब मारुती गायकवाड यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.याबाबत शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आज शनिवार(दि.२०) रोजी सकाळी ७ वाजणेच्या सुमारास शिरसगाव काटा नजीक जगतापवस्ती येथे न्हावरा तांदळी रोड च्या कडेला अनोळखी पुरुष जातीचे प्रेत(अंदाजे वय-६०) आढळुन आले.सदर मयत फिरस्ता दिसत असल्याचे व येणारे जाणारे व गावातील लोकांकडे चौकशी केली असता सदर मयताचे कोणीही ओळखत नसल्याचे वारस दिसुन येत नाही असे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेची माहिती कळताच मांडवगण फराटा पोलीस स्टेशनचे जमादार आबासाहेब जगदाळे यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला.याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस हवालदार आबासाहेब जगदाळे हे करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या