चिमुरडीच्या त्या प्रसंगाने अनेकांचा उडाला थरकाप

Image may contain: textसणसवाडी,ता.२० जुलै २०१९(प्रतिनीधी) : पत्नीचा खुन करुन पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली असुन मुलीने पोलीसांना घटनेची माहिती दिल्याने हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या घटनेत संतोष देविदास बच्चेवार असे आत्महत्या केलेल्या व उर्मिला देविदास बच्चेवार असे खुन झालेल्या महिलेचे नाव असुन या दांपत्यांची मुलगी कोमल संतोष बच्चेवार(वय.९वर्षे,इयत्ता ३री सध्या रा.सणसवाडी,मुळ रा.चांडोळा,ता.नांदेड) हिने पोलीसांना माहिती दिली आहे.तर उर्मिला बच्चेवार यांचा भाउ गजानन मद्रेवार यांनी उशिरा राञी शिक्रापुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

याबाबत कोमलने पोलीसांना दिलेल्या जबाबानुसार,खैरेनगर येथील महिलेची व संतोष यांची ओळख होती.त्यांनी सदर महिलेस पैसे उसने व कोमलच्या आइचे दागिने दिले होते.यावरुन मयत हे त्या महिलेस सतत दागिने मागत होते.यावरुन संतोष व उर्मिला यांची सदर महिलेशी वाद व्हायचे.(दि.१७)रोजी यावरुन संतोष व उर्मिला यांची सदर महिलेशी भांडन झाले.त्यानंतर पुन्हा सदर महिलेकडे पैसे मागितले असता,सदर महिलेशी भांडन झाल्यानंतर त्या महिलेने संतोष यांना एक लाख रुपये दिले होते.

त्यानंतर(दि.१९) रोजी मयत संतोष व उर्मिला हे मोटारसायकल वरुन सदर महिलेकडे पैसे मागण्यासाठी गेले परंतु त्या महिलेने पैसे न दिल्याने कोमल हिचेसह संतोष व उर्मिला या तिघांनीही पाबळ पोलीस स्टेशनला गेल्यानंतर संतोष यांनी पोलीसांत तक्रार दिली.त्यानंतर मोटारसायकल वरुन येताना संतोष यांनी गाडीला बांधलेले कॅंन मधील डिझेल कोमल व पत्नी उर्मिला यांच्या व स्वत:च्या अंगवर ओतले.माञ अंगाची लाहीलाही झाल्याने संतोष यांनी कोणालाही पेटविले नाही.

त्यानंतर पाबळ येथुन निघाल्यानंतर एका डोंगराजवळ आल्यानंतर संतोष यांनी कोमल हिस डोंगरावर मामा येणार आहेत असे सांगुन पत्नी कोमल व उर्मिला यांना घेउन गेले.त्यानंतर कोमल हिस संतोष याने मम्मी व मी खोटी खोटी आत्महत्या करतो असे सांग तु पोलीसांना जाउन सांग असे सांगितले.यावेळी कोमल ही खाली उतरत असताना आई उर्मिला यांचा मोठ्याने आवाज आल्याने खाली उतरत पळत जात डोंगराजवळ जाणा-या वाटसरुंना माहिती सांगताच सदर वाटसरुने तिला पोलीस स्टेशनला सोडले.यानंतर घडलेली हकिकत कथन केली.

सदर घटनेची माहिती व गांभिर्य लक्षात घेत शिक्रापुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली असता, मयत उर्मिलाच्या डोक्यात दगड घातल्याने ती मृत तर तिच्याच साडीने संतोष याने गळफास घेतल्याने मृत झाल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी राञी उर्मिला बच्चेवार यांचा भाउ गजानन मद्रेवार यांनी उशिरा राञी शिक्रापुर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला.या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली असुन पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या