शिरूरचे नंदनवन करणाऱया धरणाचा पाणीसाठा चिंताजनक

Image may contain: sky, mountain, outdoor and nature
शिरूर, ता. 25 जुलै 2019: शिरूर तालुक्याचे नंदनवन करणारे चासकमान धरणाच्या परिसरात कमी पाऊस असल्याने पाण्याची स्थिती चिंताजणक आहे. याचा परिणाम शिरूर तालुक्यावर होणार आहे.

खेड व शिरूर तालुक्‍याचे लक्ष लागून राहिलेल्या चासकमान (ता. खेड) धरणाचा पाणीसाठा गेल्या नऊ दिवसांपासून 47.90 (3.63 टीएमसी) टक्‍क्‍यांवरच स्थिरावला आहे. खेड तालुक्‍यासह शिरूर तालुक्‍याचे नंदनवन करणाऱ्या चासकमान धरणाच्या परिसरासह पाणलोट क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ ठप्प झाली आहे. धरणातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत आहे.

सद्यःस्थितीत धरणात 47.90 टक्के पाणीसाठा झाला असून, मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्‍क्‍यांनी कमी आहे. मागील वर्षी 24 जुलै रोजी धरणातील पाणीसाठा 97.15 टक्‍क्‍यांवर पोचला होता. त्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही गेट उघडून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. मात्र, यंदा धरणातील पाणीसाठा गेल्या नऊ दिवसांपासून 47 टक्‍क्‍यांवरच स्थिरावला आहे. शिरूर तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती पाहता 17 जुलैपासून कालव्याद्वारे 550 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.

चासकमान धरणाची माहिती

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम
उंची : ४६.२८ मीटर (सर्वोच्च)
लांबी : ९५८ मी

दरवाजे
प्रकार : S - आकार
लांबी : ७२ मीटर
सर्वोच्च विसर्ग : सेकंदाला ३९६२ घनमीटर
संख्या व आकार : ७ ( १२ X ८ मी)

पाणीसाठा
क्षेत्रफळ : १८.२१८ चौरस कि.मी.
क्षमता : २४१७ लक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २१४५ लक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : २०७५ हेक्टर

डावा कालवा

लांबी : १४४ कि.मी.
क्षमता : सेकंदाला २६.३३ घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : ६८५०५ हेक्टर
ओलिताखालील शेतजमीन : ५२७५० हेक्टर

उजवा कालवा
लांबी : १८ कि.मी.
वीज उत्पादन
जलप्रपाताची उंची : १८ मीटर
जास्तीतजास्त विसर्ग : १०.४२ क्युमेक्स
निर्मिती क्षमता : ३ मेगा वॅट
विद्युत जनित्र : २ X १.५० मेगा वॅट

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या