विद्याधामच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड

Image may contain: 6 people, people standingदेवदैठण,ता.२५ जुलै २०१९(प्रा.संदीप घावटे) : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील विद्याधाम प्रशालेच्या तीन खेळाडूंची राज्यस्तर मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .
 
अहमदनगर जिल्हा अॅम्युचर अॅथलेटीक्स असोशिएशन द्वारा लोणी प्रवरा येथे जिल्हास्तर मैदानी स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात निकीता कोरके हिने ४ मीटर लांब उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला.१६ वर्ष वयोगटात शुभांगी वाखारे हिने ४.३५ मीटर लांब उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला, तसेच १८ वर्ष वयोगटात वैष्णवी वाघमारे हिने तिहेरी उडीत प्रथम क्रमांक मिळवला. तिने १०.४० मीटर तिहेरी उडी मारली. या तिघींची पुढील महिन्यात सांगली व डेरवण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या खेळाडू अ.नगर जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच प्रियंका साठे हिने तिहेरी उडीत तृतीय क्रमांक मिळवला आहे अशी माहिती मुख्याध्यापक संभाजी शेळके यांनी दिली.
      
या यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संदीप घावटे, अमोल कातोरे यांचे मार्गदर्शन लाभले तर यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे  मुख्याध्यापक संभाजी शेळके, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र भटेवरा,सचिव तु.म.परदेशी,सहसचिव बाबासाहेब चोरमले,उद्योजक विकास आढाव, पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, सरपंच जयश्री गुंजाळ, उपसरपंच पुजा बनकर, महाराष्ट्र राज्य अॅथलेटीक्स असोशिएशनचे सहसचिव दिनेश भालेराव यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या