शिरुर शहरातील परप्रांतियांचा बंदोबस्त करा-घोगरे

शिरुर,ता.२८ जुलै २०१९(प्रतिनीधी) : शिरुर शहर बसस्थानकातील फिरते विक्रेते(हॉकर्स) यांचा परवाना ज्या मुळ मालकांच्या नावावर आहे.त्यांनीच तो चालवावा,परप्रांतिय विक्रेते यांच्या झालेल्या सुळसुळाटाचा बसस्थानकाचे आगारप्रमुख यांनी तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी मनसेचे शिरुर शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केली आहे.

मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, शिरुर शहरात दररोज हजारो बसगाड्यांची ये-जा होत असते.या बसस्थानकात परप्रांतिय फिरते विक्रेते(हॉकर्स) काम करत आहेत.सदरील फिरते परप्रांतिय विक्रेते यांच्याकडे कोणताही अधिकृत स्वत:चा परवाना नाही.त्यांचा बसस्थानकात गेल्या अनेक दिवसांपासुन सुळसुळाट झाला असुन ते प्रवाशांना अतिरिक्त दरानेही खाद्यपदार्थ विक्री करत आहेत.तसेच ज्यांच्याकडे फिरते विक्रेते(हॉकर्स) परवाना आहे ते मुळ मालक यांनी हे परवाने परस्पर परप्रांतियांना विक्रीसाठी दिले असल्याचे निदर्शनास आले आहेत. ज्यांच्याकडे हे परवाने आहेत त्यांनीच स्वत: खादयपदार्थांची विक्री करावी व त्याचा स्वत: वापर करावा नाहीतर आगारप्रमुखांनी तत्काळ अशा अनधिकृत विक्रेत्यांची दखल घेउन त्याचे परवाने कायमचेच रद्द करावेत.

जे होतकरु,गरजु आहेत त्यांनाच असे परवाने द्यावे तसेच बचतगटांनाही यात सामील करुन घ्यावे अशी मागणी बोलताना केली.यासंदर्भात शिरुर बसस्थानकाचे आगारप्रमुख महेंद्र माघाडे यांना मनसेच्या वतीने निवेदन दिले असुन मागण्यांची तातडीने दखल घेउन कारवाई करावी अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन न करता गांधीगिरीने आंदोलन करणार असल्याचे त्यांनी आगारप्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे,मनसेचे वाहतुक सेनेचे रविंद्र गुळादे,मनसेचे शहरउपाध्यक्ष प्रविण तुबाकी आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या