शिरुर तालुक्यात मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना राबवा

शिरुर,ता.२९ जुलै २०१९(प्रतिनीधी) : इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना लागु करण्यात यावी अशी जनविकास फौंडेशनचे अध्यक्ष तुषार वेताळ यांनी शिरुर गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,महाराष्ट्र शासनाची इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या  इतर मागास प्रवर्गातील मुलांना मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना व इयत्ता १० वी पर्यंतच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती (डी.एन.टी) विद्यार्थ्यांना भारत सरकार ची डॉ.आंबेडकर मॅट्रिकपुर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना सुरु असुन याबाबत २७ मे २०१९ रोजी शासन निर्णय झाला आहे.या निर्णयानुसार शिरुर तालुक्यातील सर्व शाळा यांना याबाबत माहिती देउन संबंधित शिष्यवृत्ती योजना त्वरीत राबविण्यात यावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

या मागणीचे निवेदन शिरुर पंचायत समितीचे गटशिक्षनाधिकारी राजेश मुरलीधर लोंढे यांना देण्यात आले.यावेळी तुषार वेताळ,सचिव भुषण कडेकर,नितीन ताकवणे,मधुकर सातपुते आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या