अपघातग्रस्त तरुणाला 'त्या' युवकाच्या तत्परतेने मदत

Image may contain: Ganesh Shindeरांजणगाव गणपती, ता.३० जुलै २०१९ (प्रतिनीधी) : पुणे-नगर महामार्गावर अपघात होउन गंभीर अवस्थेत पडलेल्या तरुणाला करडे येथील उद्योजकाने गाडी थांबवुन मदतीसाठी प्रयत्न केल्याने त्या युवकाला तातडीची मदत मिळू शकली.

याबाबत सविस्तर असे कि,सोमवार(दि.२९) रोजी राञी पुणे-नगर महामार्गावर रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत एक युवक रस्त्यावर पडलेला होता.यावेळी अंधार व पावसाचेही अधुनमधुन येणे जाणे असल्याने वाहने न थांबता जोरात जखमीला डावलुन जात होती.परंतु कोणीही जखमीला मदत करत नव्हते.वा कोणीही गाडी थांबवण्याचे कष्ट घेत नव्हते.

No photo description available.दरम्यान या रस्त्याने जाणारे करडे येथील उद्योजक अजय जगदाळे यांनी स्वत:ची गाडी थांबवुन गंभीर जखमीच्या अंगावरुन इतर गाड्या जाउ नये यासाठी काही अंतरावर असणारे बॅरिकेट लावले.व मदतीसाठी प्रयत्न सुरु केले.हे करत असताना युवकाच्या शरीराची हालचाल जगदाळे यांना जाणवली.त्यामुळे जगदाळे यांनी तत्काळ पोलीसांना संपर्क साधुन ऍम्ब्युलन्सची मागणी केली.काही वेळातच रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस घटनास्थळी ऍम्ब्युलन्ससह दाखल झाले. पोलीसांना तत्परता  दाखवत जखमीला तत्काळ रुग्णालयात हलविले.

पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.त्याचप्रमाणे अनेक अपघाताच्या ठिकाणी माणसे मदत करण्याचे टाळतात.परंतु अजय जगदाळे यांनी गंभीर जखमीला मदत अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचे दाखवुन दिले.त्यांचे व पोलीसांच्या तत्परतेचे कौतुक केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या