घोड उजव्या कालव्याच्या पाण्याचे ग्रामस्थांनी केले पुजन

शिरसगाव काटा,ता.३० जुलै २०१९(प्रतिनीधी) : दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर उजव्या कालव्याला आलेल्या पहिल्या पाण्याचे शिरसगाव काटा ग्रामस्थांनी पाणीपुजन करुन स्वागत केले.

शिरुर तालुक्याला फेब्रुवारी महिन्यांपासुन सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.गेल्या अनेक दिवसांपासुन शिरसगावसह परिसरात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता.परंतु जुलै महिन्याच्या अखेरीस धरणक्षेञात पावसाने चांगलीच हजेरी लावली.त्यामुळे घोडनदीला पावसाचे चांगले पाणी आले.घोडधरणात पाणी आल्यानंतर घोड उजव्या कालव्यातुन पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे.हे पाणी शिरसगाव काटा गावानजीक पोहोचल्यानंतर शिरसगाव काटा
ग्रामस्थांनी पाण्याचे पुजन केले.यावेळी अनेकांनी या पाण्याने तात्पुरता  पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत समाधान व्यक्त केले.

यावेळी शिरसगाव काटा च्या सरपंच पल्लवी जगताप,घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, उपसरपंच शिवाजी सोनटक्के,माजी सरपंच संजय शिंदे, विनायक जगताप, प्रकाश जाधव, नंदु कदम, मोहन जाधव, जालिंदर शिंदे,विकास जगताप,संदिप कदम आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या