राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला? उत्सुकता शिगेला...

No photo description available.
शिरूर, ता. 10 ऑगस्ट 2019: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीचा चेंडू पवारसाहेबांच्या कोर्टात टोलवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार?, याबाबतची उत्सुकताही शिगेला पोचली आहे.

शिवस्वराज्य यात्रे'च्या निमित्ताने शिरूर येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी बारामतीतून मी स्वतः, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील व परळीतून धनंजय मुंडे लढणार असल्याचे जाहीर केले. शिरूरचा उमेदवाराचे नाव न घेतल्यामुळे त्यावेळी उपस्थितांनी, "शिरूरची उमेदवारी जाहीर करा' असा पुकारा केला. त्यावर, "ते आता लगेच सांगता येणार नाही. शिरूरचा उमेदवार पवारसाहेब सांगतील,' असे त्यांनी स्पष्ट केले.

जी आमदार अशोक पवार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या समर्थकांनी "शिरूरचा उमेदवारही सांगा,' असे म्हणत आपापल्या नेत्याच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरवात केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत अजित पवार यांनी, "शिरूरमधून लढण्यास अनेकजण इच्छुक आहेत. प्रत्येकाला इच्छा प्रदर्शित करण्याचा अधिकार असून, त्यात गैर काहीही नाही. इच्छुकांच्या भावना समजण्यासारख्या असल्या; तरी पक्षाकडून अखेर एकालाच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यावेळी आपसांतले हेवेदावे विसरून सर्वांनी एकदिलाने काम करण्याची व पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात कॉंग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी 175 आमदारांची गरज असून, एक-एक जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्याला उमेदवारी मिळेल; त्याचे इमानेइतबारे काम करा. तरच सरकार येईल. आणि सरकारच आले नाही; तर आपल्या हाती काहीही राहणार नाही.'' अशा गर्भित शब्दांत कार्यकर्त्यांना ठोकरले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे उत्सुकता लागली आहे. शिरूरमधून उत्सुक उमेदवारांची संख्याही जास्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या