पूरग्रस्तांसाठी रांजणगाव देवस्थान ट्रस्टचा मदतीचा हात

Image may contain: 11 people, people smiling, people sitting, people standing and indoorरांजणगाव गणपती,ता.१५ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने पुरग्रस्तांसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश पालकमंञ्यांकडे सुपुर्द करण्यात आला.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत पुरविली जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी केलेल्या पूरग्रस्तांसाठीचे मदतीचे आवाहनाला प्रतिसाद देत श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी आज बुधवार(दि.१४ ऑगस्ट) रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांचेकडे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर, उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर, सचिव डॉ. संतोष दुंडे यांनी सुपूर्द केला.

यावेळी खासदार गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी  जयश्री कटारे यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांचे मदतीसाठी राज्यातील विविध धार्मिक व सामाजिक संस्था यांचेकडून मदतीचा ओघ चालू आहे.परंतु महापुरामुळे अनेक घरे उध्वस्त झाल्यामुळे पुन्हा संसार उभे करण्याचे मोठे आव्हान पूरग्रस्तांचे समोर आहे. सामाजिक बांधिलकीचे जाणीवेतून श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट चे वतीने पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेट देवून आवश्यक तेथे संसार उपयोगी भांडी, धान्य, किराणा, शालेय साहित्य, पिण्याचे पाणी, घर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करणार असल्याचे अध्यक्ष अॅड. विजयराज दरेकर यांनी सांगितले.

सांगली व कोल्हापूर येथील जिल्हाधीकार्यांशी याबाबत संपर्क करण्यात आला असून त्यांचे सूचना व मार्गदर्शनानुसार मदत करणार असल्याची माहिती यावेळी उपाध्यक्ष प्रा. नारायण पाचुंदकर यांनी दिली. तसेच परिसरातील ग्रामस्थ व भाविकानाही मदतीचे आवाहन सचिव डॉ. संतोष दुंडे यांनी करत भविष्यात ही पूरग्रस्तांचे पुनर्वसनासाठी भरीव मदत करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या