श्री गणेशा हॉस्पिटलकडून ५० आजी माजी सैनिकांचा सन्मान

Image may contain: 6 people, crowd, sky and outdoorशिरुर,ता.१५ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : पूर असो, भुकंप असो कि,नैसर्गिक आपत्ती आपला देश अन आपले बांधव संकटात सापडले कि धावून येत असतात ते आपले जवान. जीवाची पर्वा न करता आपल्या बांधवांच्यासाठी अहोराञ तत्पर असतात ते देशाचे सैनिक याच सैनिकांचा विशेष सन्मान श्री गणेशा हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला.

Image may contain: one or more people, crowd and outdoorसमाजात मातृसेवा,पितृसेवा,रुग्णसेवा यांचबरोबर देशसेवेला अनन्यसाधारण महत्व आहे.म्हणुनच देशसेवेचं हे महत्व जाणुन घेत श्री गणेशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आज आगळया वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशासाठी सिमेवर जीवाची बाजी लावणा-या सैनिकांचा हॉस्पिटलच्या वतीने विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात शिरुर शहर व तालुक्यातील सुमारे ५० आजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoorया प्रसंगी उपस्थितांचे श्री गणेशा हॉस्पिटलचे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर यांनी स्वागत करत श्री गणेशा हॉस्पिटलने शिरुर येथे हॉस्पिटल उभारणीनंतर सैनिक व सैनिक कुटुंबांसाठी आजतागत सुमारे १४ लाख रुपये बील माफ करत या द्वारे सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचे काम केले असुन सैनिकांसाठी यापुढेही हॉस्पिटलच्यावतीने यशाशक्ती मदत कायम सुरु ठेवणार असल्याचे डॉ.राजुरकर यांनी बोलताना सांगितले.आजी माजी सैनिकांनी हॉस्पिटलचे सैनिकांप्रती व समाजाप्रती जपले जाणारे उत्तरदायित्व प्रशंसनीय असल्याचे सांगत हॉस्पिटलचे कौतुक केले.हॉस्पिटलच्या वतीने कॅप्टन प्रभाकर थेउरकर,कॅप्टन जे.के.कटके,कॅप्टन दत्ताञय वाखारे,कॅप्टन ज्ञानदेव देवखिळे, बाळासो शेवाळे, भास्कर चव्हान, बी.एस.पवार, सुरेश जाधव, सोमनाथ सोनवणे, राजु हेलावडे, संजय कदम, गुलाबराव खरबस, निलेश सोनवणे, भाउसो सोनवणे,महादेव घावटे, नामदेव घावटे, भिमराव सोनवणे,भिकाजी जासुद,दत्ताञय वाखारे,विकास दंडवते,पंढरीनाथ पाचर्णे,बबन पवार,अंबादास पवार,वीरपत्नी अनुसया दळवी,रंगनाथ नवले,शिवाजी औटी, बुवाजी खेडकर, गोरक्ष खेडकर, अनिल खेडकर, बंडु कोहोकडे, शिवाजी कोहोकडे, रंगनाथ नवले, सुभाष नवले, बबन फलके, शिवाजी फलके, प्रकाश कर्डिले, दशरथ गो-हे, शिवाजी कापरे, शिवाजी फलके, राजु गो-हे या सैनिकांचा सन्मानचिन्ह देउन विशेष सन्मान करण्यात आला.

Image may contain: one or more people and people standingया कार्यक्रमाला जयहिंद फौंडेशनचे तुषार घोरपडे,शिरुर ग्रामीण चे माजी उपसरपंच संजय शिंदे,अण्णापुरचे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण कुरंदळे,मोहन पवार,वैभव हॉटेलचे अनिल सोनवणे,अरुण यादव,पराग कोळपकर,यांसह हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स,स्टाफ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरज खरात, ऋतुराज चव्हान, ऋषिकेश चव्हाण, प्रशांत नाईक,रवि शेटे,गिरीजा आपरे,शिवानी खंडागळे,चेतना मेश्राम,अमृता पाटील,शरद राजापुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Image may contain: 3 people, people smiling, people standing and outdoorडॉ.सागर केदारे,ज्युहिता सिंन्हा यांनी कार्यक्रमाचे सुञसंचालन केले.डॉ.विशाल महाजन प्रास्ताविक केले तर अभिजित चव्हाण यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या