अमोल नलगेंचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान

Image may contain: 2 people, people standing, shoes, child, outdoor and natureरांजणगाव गणपती,ता.१६ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉंस्टेबल अमोल नलगे यांनी दरोड्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपञक देउन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

याबाबत सविस्तर असे कि,रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले अमोल नलगे हे सहका-यांसह(दि.२) रोजी रांजणगाव परिसरात राञपाळीवर गस्त घालत असताना एक कार संशयास्पद थांबलेल्या आढळुन आली होती.या वेळी नलगे यांनी वरिष्ठांना माहिती दिली.कार मधील तरुणांना पाळत ठेवत असल्याचा संशय आल्याने यातील तरुण पळुन गेले.सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन तरुणांना ताब्यात घेउन चौकशी केली असता,आरोपींकडे धारदार शस्ञ आढळुन आले.तर सदर आरोपींनी टेंपो चालकाला लुटल्याची कबुली दिली होती.यातील आरोपींवर अहमदनगर जिल्हा,सातारा जिल्हयात दरोडा,जबरी चोरी,खुनासह,दरोडा,चोरी यासारखे सात गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले होते.

अमोल नलगे यांच्या याच कामगिरीची दखल घेत स्वातंञ्यदिनी पुणे ग्रामीण मुख्यालयात पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या प्रशस्तिपञक देउन विशेष सन्मान करण्यात आला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या