शिरुरचा साहिल घालणार 'किलिमांजारो' ला गवसणी

Image may contain: snow, outdoor and natureशिरुर, ता.१६ ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरूरचा रहिवासी असलेल्या साहिल बांदल या नवोदित गिर्यारोहकानं आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर माउंट किलीमांजारो या शिखरावरील मोहिमेत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

पुण्यातील गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग च्या वतीने सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या या मोहिमेमध्ये साहिलची निवड झाली आहे. माउंट किलीमांजारो हे ५८९५ मीटर्स उंचीचं टांझानिया या देशात वसलेले संपूर्ण आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे. जगातील सात सर्वोच्च शिखरे अर्थात “सेव्हन समीटस्”या मालिकेत या शिखराचा समावेश होतो.  या शिखरावरील चढाईसाठी गिर्यारोहकांचा चांगलाच कस लागतो.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी साहिलनं बेसिक आणि अॅडव्हांस माउंटेनियरिंग कोर्स तसेच बेसिक रॉक क्लायंबिंग कोर्स असं प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या मोहिमेचे नेतृत्व शिरूरमधील करंदी गावाचे अनुभवी गिर्यारोहक व पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेचे सदस्य कृष्णा ढोकले करणार आहेत. कृष्णा ढोकले यांनी यापूर्वी एव्हरेस्ट, कांचनजुंगा यासह इतर अनेक गिर्यारोहण मोहिमा यशस्वी केल्या आहेत. या किलीमांजारो मोहिमेला साहिलला सुमारे २.५ लक्ष रुपये (प्रत्येकी) इतका खर्च येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या