निमोणे व चिंचणी च्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

Image may contain: 18 peopleनिमोणे,ता.१६ अॉगस्ट २०१९(तेजस फडके) : मुंबई येथे झालेल्या कराटे स्पर्धेत  निमोने आणि चिंचनी गावामधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण,कांस्य,रौप्य पदके मिळवीत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

नुकत्याच मुंबई येथे कराटे स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.या स्पर्धांमध्ये शिरुर तालुक्यातील निमोणे व चिंचणी येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या सहभागी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण,कांस्य,रौप्य अशा प्रकारचे पदके मिळवून यश संपादन केले.

या झालेल्या स्पर्धांमध्ये काळे तनिश रमेश (रौप्य),काळे रोहित अनिल(रौप्य),काळे अथर्व भाऊसाहेब (कांस्य ,रौप्य),काळे प्रथमेश पांडुरंग (2 रौप्य),गव्हाने शुभम सतिष(2 कांस्य),काळे साई सोन्याबापु (सुवर्ण,रौप्य),लखारे भक्ति सतिष(सुवर्ण),चव्हांन प्रिया नीलेश(सुवर्ण,रौप्य),चव्हांन प्रेम योगेश(सुवर्ण),जगताप आदित्य गौतम(2सुवर्ण),रायकर ऋषिकेश सीताराम(सुवर्ण,कांस्य),बोरुडे महेश बबन(सुवर्ण),घाडगे प्रणव सोमनाथ(कांस्य),येवले सौरभ अनिल(2 रौप्य),जगताप गौरव संतोष(रौप्य,कांस्य),खेड़कर अजित तुकाराम(रौप्य,सुवर्ण)शेख विजुभाई आमिर(कांस्य)रायकर विशाल गोरख(रौप्य),इनामदार अमन सलीम(सुवर्ण,रौप्य) अशा पदकांची कमाई केली.

यशस्वी विद्यार्थ्यांना सुनील कळसकर व विनोद बालगुड़े यांनी मार्गदर्शन केले.मुंबईत झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे अनेक अडथळे निर्माण झाले तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या धाड़साने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले.सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे शिरुर तालुक्यासह निमोणे ग्रामस्थ,निमोणे आयडॉल्स,चिंचणी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या