शिरूरला बाळंतपणादरम्यान 'पुन्हा' महिलेचा मृत्यू

Image may contain: screenशिरूर, ता. 18 ऑगस्ट 2019: शिरूर येथील भिसे हॉस्पिटमध्ये बाळंतपणासाठी महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र, बळंतपणादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

महिलेच्या नातेवाईकांनी व स्थानिकांनी संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याती मागणी केली आहे. या दवाखाण्यात यापूर्वीही बाळंतपणासाठी आलेल्या महिलांच्या मृत्यूचे प्रकार घडले असून, कारवाईची मागणी केली जात आहे.

रबीया असिफ शेख (वय 19, रा. हल्दी मोहल्ला, शिरूर) असे मृत्युमुखी पडलेले महिलेचे नाव आहे. तिचे वडील युनूस हुसेन पठाण (रा. शिरूर) यांनी याबाबत शिरूर पोलिसांना माहिती दिली असून, पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

रबीया यांना भिसे हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल केले होते. बाळंतपण झाल्यानंतर त्यांना अचानक त्रास होऊ लागला. त्या बेशुद्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दुसऱया रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे महिलेचे कुटुंबीय व नातेवाईक संतप्त झाले. हॉस्पिटलबाहेर जात संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित डॉक्टर दवाखाना बंद करून गेल्याने जमाव आणखी संतप्त झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी दधाव घेत जमावाला शांत केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या