शिरुर पोलीस व पञकार बांधवांचा अनोखा रक्षाबंधन

Image may contain: 2 people, people sitting, child and indoorशिरुर,ता.२० अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस व शिरुर शहरातील पञकार बांधवांनी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या विशेष मुलांसोबत अनोखा रक्षाबंधन साजरा करत विशेष मुलांचा आनंद द्विगुनित केला.

Image may contain: 3 people, people sittingशिरुर शहरातील आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन हि विशेष मुलांची संस्था असुन या संस्थेत सुमारे २५ विद्यार्थ्यांचा सांभाळ केला जातो.या मुलांच्या आयुष्यात रक्षाबंधन सण म्हणजे आनंद वाढवणारा क्षण.या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुनित करण्यासाठी शिरुर पोलीस स्टेशन व शिरुर तालुका पञकार संघाच्या वतीने अनोख्या रक्षाबंधनचे आयोजन करण्यात आले.यावेळी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनच्या विशेष मुलांनी पोलीस कर्मचा-यांना व शहरातील पञकार बांधवांना औक्षण करुन राख्या बांधल्या.यावेळी विशेष मुलांनी केलेल्या स्वागताने सर्वच भारावुन गेले.

Image may contain: 5 people, people sitting, crowd and outdoorशिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी प्रथमच भेट देत संस्थेच्या सामाजिक कार्याची माहिती घेतली.यावेळी संस्थेच्या अडचणी समजुन घेतल्या तसेच संस्थेला शैक्षणिक कामासाठी संगणक भेट दिले.पञकार बांधवांनी संस्थेच्या प्रत्येक अडचणीत संस्थेशी सोबत राहत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

संस्थेच्या संस्थापिका राणीताई चोरे यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.यावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नारायण सारंगकर,पोलीस कर्मचारी मुकुंद कुडेकर,साठे,पञकार नितीन बारवकर,अभिजित आंबेकर,अरुण मोटे,रमेश देशमुख,रविंद्र खुडे यांसह विद्यार्थी,संस्थेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या