पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या कारवाईचा धडाका सुरुच

Image may contain: 2 people, people standing and outdoorशिरुर,ता.२१ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने शिरुर तालुक्यासह जिल्ह्यात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला असुन त्यांच्या या कारवाईचे नागरिकांकडुन स्वागत करण्यात येत आहे.

पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच शिरुर येथे गस्ती दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्तुल,तीन जिवंत काडतुसे,घातक शस्ञ यांच्यासह गुन्हयात वापरलेली कार असा मिळुन सुमारे ५ लाख ३ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त आला.तर याप्रकरणी तीन आरोपींनाही अटक केली आहे.तर गुन्हे शाखेच्या पथकाने मावळ येथेही कारवाई करत एक गावठी पिस्तुल,जिवंत काडतुस यांसह गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त केली.याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

त्याचप्रमाणे गुन्हे शाखेने दौंड विभागात गेल्या तीन महिन्यांत सुमारे ३ खुनाचे गुन्हे,२ दरोडे,५ जबरी चो-या,२ घरफोडया,१७ चो-या,तसेच सुमारे १ कोटीचा मुद्देमालही जप्त केला.त्याचप्रमाणे इतर किचकट गुन्हयांचा तपासही करुन गंभीर गुन्हयांतील गुन्हेगारांना अटक केली आहे.हि कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर,दत्ताञय गुंड,रविंद्र मांजरे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,जीवन राजगुरु,सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय गिरमकर यांसह राजु मोमीन,सचिन गायकवाड,जितेंद्र कदम,महेश गायकवाड,उमाकांत कुंजीर,शंकर जम,विजय कांचन,गुरु जाधव,धिरज जाधव,शरद वांबळे,दयानंद लिमन,निलेश कदम,शंकर जम,पोलीस हवालदार काळे,दिपक साबळे,सुनिल जावळे,जनार्दन शेळके, समाधान नाइकनवरे,बाळासाहेब खडके,सुभाष राउत,गुरु गायकवाड,प्रमोद नवले,रवि कोकरे आदींच्या पथकाने केली आहे.

दयानंद गावडे यांच्यानंतर गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणुन पद्माकर घनवट यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घनवट यांनीही त्याच वेगाने कारवाईचा धडाका सुरु ठेवला असुन गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत जिल्हयात अनेक मोठे गुन्हे उघडकिस आणले आहेत.त्यांचे व त्यांच्या पथकाने केलेले कारवाईचे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात स्वागत केले जात असुन अशाच कारवाया सुरु ठेवाव्यात अशा अपेक्षा नागरिकांकडुन व्यक्त केल्या जात आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या