शिरुर शहरातील भिसे हॉस्पिटल बंद करण्याची मागणी

No photo description available.शिरुर, ता. २१ ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर येथील भिसे हॉस्पिटलच्या गैरकारभारामुळे सदरचे हॉस्पिटल बंद करण्यात यावे अशी मागणी शिरुर शहरातील सर्वपक्षियांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

याबाबतचे निवेदन तालुका वैद्यकिय अधिकारी यांना देण्यात आले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शिरुर मधील भिसे हॉस्पिटल मधील गैरप्रकारांमुळे व तेथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व अक्षम्य दुर्लक्षामुळे आतापर्यंत सहा महिलांना बाळंतपणादरम्यान जीव गमवामा लागला आहे.(दि.१७) रोजी सबीया असिफ शेख (वय,१९,रा.हल्दी मोहल्ला,शिरुर) हि महिला भिसे हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. दुपारी साडेतीनच्या दरम्यानच्या अत्यवस्थ झाल्याने उपचार करणा-या डॉक्टरांनी इतरञ हलविण्याचा सल्ला दिला. तथापि दुस-या खासगी रुग्णालयात सदर महिलेस नेले असता, उपचारांपुर्वीच महिलेचे निधन झाल्याचे निदान करण्यात आले.या हॉस्पिटल रजिस्ट्रेशन ज्यांच्या नावावर आहे.ते डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल असून, ते कारागृहात असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई प्रस्तावित झाली आहे.

या हॉस्पिटल मध्ये सहा बाळंतपणासाठी आलेल्या महिलांचा मृत्यू झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित हॉस्पिटल बंद करण्यात यावे, हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन रद्द करावे, हॉस्पिटल चालविणा-या डॉक्टरांची सनद रद्द करावी, तसेच महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणा-या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे, नगरसेवक मंगेश खांडरे, आरपीआय चे अध्यक्ष निलेश जाधव, मनसेचे अविनाश घोगरे, सुशांत कुटे, वसिम सय्यद, राष्ट्रवादीचे निलेश पवार, हाफिज बागवान, राहिल शेख, समता परिषदेचे किरण बनकर, तुकाराम खोले, एजाज बागवान, महेबुब सय्यद आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या