देव्हडेश्वर याञेच्या आखाड्यात २०० मल्लांचा सहभाग

Image may contain: 12 people, people smilingशिरुर, ता. २२ ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर ग्रामीण (रामलिंग) येथील श्री क्षेञ देव्हडेश्वर याञेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यभरातील सुमारे २०० मल्लांनी हजेरी लावल्याची माहिती शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी दिली.

शिरुर ग्रामीण येथील श्री क्षेञ देव्हडेश्वर याञेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याञेनिमित्त आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळयात गणेश डुबे,ज्ञानेश्वर रासकर,तुकाराम रसाळ,रामेश्वर इंगळे,भरत थोरात,गोरक्षनाथ पोटे,पुरुषोत्तम पाटील आदींनी किर्तनसेवा दिली तर समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता करण्यात आली.
दरम्यान आयोजित केलेल्या कब्बड्डी स्पर्धेत पुणे जिल्हयातील एकुण १६ संघांनी सहभाग घेतला होता.या कबड्डी स्पर्धेत न्हावरे येथील मल्लिकार्जुन कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर शशिकांत भाउ युवा मंच या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.या संघास रोख व ट्रॉफीचे बक्षिस देण्यात आले.मंगळवार(दि.२०) रोजी निकाली जंगी कुस्त्यांचा आखाडा आयोजित केलेला होता.या कुस्त्यांच्या आखाड्यास राज्यभरातील सुमारे दोनशे मल्लांनी सहभाग घेतला.यावेळी अंतिम झालेल्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन राष्ट्रीय विजेता पै.सिकंदर शेख व आंतरराष्ट्रीय पैलवान सेनादल सोमवीर यांच्यात रोमहर्षक लढत झाली.यावेळी सिकंदर शेख याने कुस्ती चितपट करत प्रतिस्पर्धी सोमवीर वर विजय मिळविला.या आखाडयात सभापती शशिकांत दसगुडे व ग्रामस्थांच्या वतीने रोख बक्षिसे मल्लांना देण्यात आले.

शिरुर ग्रामीण येथील देव्हडेश्वर याञेनिमित्त विविध कार्यक्रमांचे गेल्या १९ वर्षांपासुन शिरुर ग्रामीण,रामलिंग व पंचक्रोशीच्या ग्रामस्थांकडुन यशस्वी आयोजन केले जात असुन यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात.श्री क्षेञ देव्हडेश्वर मंदिरांवर आकर्षक विद्युत रोशनाई केल्याने मंदिर परिसर विद्युत रोशनाईने फुलुन गेला होता.हा याञोत्सव सभापती शशिकांत दसगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली देव्हडेश्वर याञा कमिटी,रामलिंगनगर,पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या सहकार्यातुन शांततेत पार पडला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या