पुणे-नगर महामार्गावरील अनधिकृत दुभाजक बंद करा

Image may contain: 4 people, people standing, people sitting and indoorतळेगाव ढमढेरे, ता. २२ ऑगस्ट २०१९ (आकाश भोरडे) : पुणे-नगर महामार्गावरील अनधिकृत दुभाजकांमुळे अपघातांत वाढ होत  असुन त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
 
पुणे-नगर महामार्गावर अनेक औद्योगिक कंपन्या असून वाहनांची व नागरिकांची या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर सतत वर्दळ असते.त्यातच महामार्गाच्या कडेला असणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे डिव्हायडर तयार केले आहेत. या अनधिकृत डिव्हायडरमुळे नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तर अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन त्यामध्ये सर्वसामान्यांचा हकनाक बळी जात आहे.

त्यामुळे पुणे-नगर महामार्गावर असणारे अनधिकृत डिव्हायडर बंद करावे या आशयाचे निवेदन ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने १८ फेब्रुवारी २०१९ रोजी अनधिकृत डिव्हायडर बंद करण्यासाठी विभागीय कार्यालयास अंदाजपत्रक सादर केले असून,निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करून त्वरित काम पूर्ण करण्यात येईल  असे पत्र दिले होते. परंतू यांस सहा महिने उलटूनही अद्यापपर्यंत अनधिकृत डिव्हायडर बंद झाले नाही. त्यामुळे संबंधित प्रशासन अजून किती जणांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे. असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तरी येत्या सात दिवसांत अनधिकृत डिव्हायडर बंद करावे अन्यथा प्रशासनास अनधिकृत डिव्हायडर बंद करण्याच्या कामाचा मुहूर्त काढण्यासाठी पंचांग देऊ अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तेजस यादव, स्वप्नील दरेकर, निखिल खेडकर, अतुल साबळे  यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या