शिरूर तालुक्यातील स्थानिकांचा नोकरीचा प्रश्न सुटला...

Image may contain: 8 people, people sittingशिरूर, ता. 23 ऑगस्ट 2019: शिरुर तालुक्यातील स्थानिकांना ८०% रोजगार या कायद्याची अंमलबजावणी करावी, या क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, तसे आदेश बाळा उर्फ संजय भेगडे राज्यमंत्री कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.

महाराष्ट्रात उद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थानिकांना ८०% रोजगार देण्याची घोषणा केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणी संदर्भात शिरुर तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना 80% रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून, क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. याबाबत तीन महीन्यापुर्वी निवासी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक झाली होती. कागदपत्रे परिपत्रके त्यांनी उपलब्ध करून त्यांनी यासंदर्भात सरकारला व औद्योगिक वसाहतीतील प्रमुख व कामगार आयुक्त यांना जाब विचारला होता.

13 ऑगस्ट रोजी क्रांतिवीर प्रतिष्ठान ने एमआयडीसी बंद चे आंदोलन पुकारले होते. याची दखल मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी घेतली व आज त्या संदर्भात पुण्यात शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. या संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून, रांजणगाव एमआयडीसी मध्ये जिल्हा उद्योग केंद्र, एम्प्लॉयमेंट विभाग व एमआयडीसी यांनी संयुक्तपणे तालुक्यातील तरुणांची नोंदणी करून घेण्यासाठी नोंदणी विभाग सुरू करुन तातडीने नोंदणी करून घेऊन शिरुर तालुक्यातील सर्व कंपन्यांमध्ये त्यांना सामावून घेण्यासंबंधी अंमलबजावणी करण्याचे आदेशच मंत्री बाळासाहेब भेगडे यांनी दिले, तसेच शिरुर तालुका आणि लगतच्या तालुक्यातील तरुणांनां प्राधान्यक्रम देण्याचेही बैठकीत निर्णय घेण्यात आला. एमआयडीसी मधे तरुणांना रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचे निर्देश ही मंत्रीमहोदयांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांना दिले आहेत.

यावेळी क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे, आमदार बाबुराव पाचर्णे, सतीश पाचंगे कार्यकारी अध्यक्ष भाजप पुणे, सागर दरेकर, बाळासाहेब लांडे, शिवाजी भुजबळ भाजप कार्यकारणी सदस्य, राजेश लांडे, विजय दरेकर, अमोल दरेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्व स्थानिक तरुणांसाठी शिरुर तालुक्यातील तरुणांनां रोजगार व नोकरीची ससेहोलपट आता थांबणार असून, हे मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण /तरुणींना उपयोगी पडणार आहे, असे क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या