जिल्ह्यात प्रथमच महिला बचतगटाचा "आनंद जञा" उपक्रम

Image may contain: 20 people, people smiling, people standing, crowd and outdoorशिरसगाव काटा,ता.२४ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा येथे बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालासाठी आनंद जञा हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबविला आहे.

जिल्हा ग्रामीण विकास यंञणा,पंचायत समिती व शिरसगाव काटा ग्रामपंचायतने बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी बाजारपेठ मिळावी यासाठी भव्य आनंद जञा आयोजित केली आहे.यावेळी पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार म्हणाल्या कि,प्रत्येक क्षेञात महिला अग्रेसर असुन ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असुन ग्रामस्थांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालिका डॉ.वर्षा शिवले यांनी बचत गटातील महिलांसाठी जिल्हा बॅंकेच्या वतीने वेळोवेळी विविध उपक्रम व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात असल्याचे सांगत बचतगटाच्या महिलांसाठी असणा-या योजनांची माहिती दिली.शिरसगाव काटा येथे आयोजित केलेल्या आनंद जञेत खाद्यपदार्थ,विविध जीवनावश्यक वस्तु,महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु,यांबरोबरच घरगुती साहित्ये या विक्रीसाठी ठेवल्या असुन हे प्रदर्शन दोन दिवस चालणार असल्याचे सरपंच पल्लवी किरण जगताप यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या प्रतिभा शेलार,मिनाक्षी कोरेकर,शिल्पा ब्राम्हणे घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने,रामराव कदम,माजी सरपंच सतीश चव्हाण,रामचंद्र केदारी,संजय शिंदे,विकास जगताप,सुभाष गद्रे,सोसायटीचे चेअरमन हनुमंत माने, राजेंद्र कदम,विनायक जगताप, शिवाजी काटे,सुभाष फराटे,तंटामुक्ती अध्यक्ष सागर गराडे,एम.एस.कदम,प्रकाश जाधव,पल्लवी चोरमले,प्रहार संघटनेचे शदर जाधव,अनिल वाबळे,निर्वीच्या सरपंच सुनिता सोनवणे,कुरुळीचे माजी सरपंच प्रमोद बोरकर आदी उपस्थित होते.बचतगटाच्या समन्वयक सिमा जाधव,मनिषा जाधव,मनिषा कुलाळ, शेख भाभी आदींच्या मार्गदर्शनाखाली या आनंद जञेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा ब्राम्हणे यांनी केले.सुञसंचालन दत्ताञय लोंढे यांनी केले तर आभार नरेंद्र माने यांनी मानले.

पुणे जिल्हयात बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी या उद्देशाने आयोजित केलेले आनंद जञेचा उपक्रम हा जिल्हयात प्रथमच व नाविण्यपुर्ण असुन यात सुमारे २२ बचतगटांनी सहभाग नोंदविला.दिवसभरात नागरिकांनी दिलेल्या उत्सुर्फत प्रतिसादामुळे सुमारे दिड लाखांपर्यंत उलाढाल झाल्याचे बचतगटातील महिलांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या