शेकडो भाविकांनी घेतले रामलिंग महाराजांचे दर्शन

Image may contain: one or more people, people on stage, people standing and outdoorशिरुर, ता. २७ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : श्रावण महिण्यातील शेवटच्या सोमवार निमित्त "हरहर महादेव, रामलिंग महाराज कि जय" अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. दिवसभरात हजारो भाविकांनी शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त प्रभु श्री रामलिंग महाराजांचे शांततेत दर्शन घेतले.

आज श्रावण महिन्यातील शेवटचा व चौथ्या सोमवार मुळे पहाटे तीन वाजल्यापासूनच रामलिंग मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शिरुर शहरापासून साधारण तीन कि.मीच्या अंतरावर शिरुर ग्रामीण (जुने रामलिंग) येथे रामलिंग महाराजांचे मंदिर आहे.दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते याशिवाय  दर सोमवारी व श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शिरुर, पारनेर, श्रीगोंदा व पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी रामलिंग मंदिरात येतात.श्रावण महिनात शिरुर शहर व परिसरातील शेकडो भाविक दररोज पहाटे पायी दर्शनासाठी रामलिंगला येत असतात.

शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत म्हणुन प्रसिद्ध असलेले प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनास श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर, आंबेगाव या ठिकांणाहुन शेकडो भाविक दर्शनासाठी आले होते. शिरुर शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावर असणा-या प्रभु श्री.रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासुन ते सायंकाळ पर्यंत भाविकांनी दर्शनास लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या. दर्शनास आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या ठिकाणी विविध प्रकारची स्टॉल,खेळण्यांची दुकाने यांनी परिसर गजबजुन गेला होता.तर मंदिर व पररिसरात विद्युत रोशनाई केल्याने परिसर फुलुन गेला होता. प्रचंड झालेल्या गर्दीने परिसराला याञेचे स्वरुप आले होते.रामलिंग देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पोपटराव दसगुडे, बलदेव सिंग परदेशी, रावसाहेब घावटे या निमित्ताने दिवसभर भाविकांना सुलभतेने दर्शन मिळावे यासाठी लक्ष ठेवून होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या