गुन्हे शाखेकडून महिन्यात सात पिस्तूल जप्त

Image may contain: 5 people, people standing and indoorपुणे, ता. २७ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हयात महिनाभरात केलेल्या कारवाईत सात गावठी पिस्तूल जप्त केल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

याबाबत माहिती देताना घनवट यांनी सांगितले कि, पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या आदेशाप्रमाणे विविध गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली असुन अग्निस्ञ पकडण्याकामी विशेष मोहिम राबविली जात आहे.या पथकातील कर्मचा-यांनी (दि.१३) रोजी १ गावठी पिस्तुल १ जिवंत बुलेट,(दि.१८) रोजी २ गावठी पिस्तुल ३ जिवंत बुलेट,(दि.१९) रोजी १ गावठी पिस्तुल व १ जिवंत बुलेट,(दि.२३) रोजी २ गावठी पिस्तुल ३ जिवंत बुलेट असे ६ गावठी पिस्तुल  व ८ जिवंत बुलट हे जप्त केले आहे.

त्याचप्रमाने (दि.२६) रोजी पानशेत एसटी स्टॅंड परिसरात एका व्यक्तीकडे पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ताब्यात घेत बेकायदा,बिगरपरवाना एक गावठी पिस्तुल, एक रिकामी मॅग्झीन, दोन जिवंत काडतुस जप्त केले आहेत. याबाबत ग्रामीण गुन्हे शाखेचे ही कारवाई अशीच सुरु राहणार असुन या पथकास पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी बक्षिस जाहिर केले असल्याचे गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या