Video : 12 वर्षीय मुलीचा 25 वर्षाच्या मुलासोबत विवाह

No photo description available.कासारी, ता.२८ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर तालुक्यातील कासारी येथे कामानिमित्ताने राहणाऱ्या एका दाम्पत्याने त्यांच्या बारा वर्षीय मुलीचे लग्न पंचवीस वर्षीय मुलाशी उस्मानाबाद येथील महादेव मंदिरात लावून दिले असल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर असे कि, कासारी कामानिमित्ताने राहणारे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचे आई- वडील यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्याशी ओळख झालेली होती. त्यांनतर जुलै महिन्याच्या अखेरीस दोन्ही कुटुंबातीने चर्चा करून मुलगी हि बारा वर्षाची असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न प्रवीण सोबत ठरविले.

त्यांनतर कळंब (जि.उस्मानाबाद) येथील महादेव मंदिरात अल्पवयीन मुलीचे व प्रवीण यांचे लग्न त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांना न सांगता लावून दिले. त्यांनतर मोजक्या काही दिवसातच नवविवाहित प्रवीण व सानिया (नाव बदलले आहे) हे मुलीचे आई वडील राहत असलेल्या कासारी (ता. शिरूर) येथे राहण्यास आले. या काळामध्ये प्रवीण याने मुलीच्या आई वडिलांना काही पैसे उसने दिलेले होते. त्यामुळे प्रवीण याने सानिया (नाव बदलले आहे) हिस तिच्या आई वडिलांना उसने पैसे दिल्याच्या कारणावरून मारहाण केली. त्यामुळे सानिया हिने तिच्या मामांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनतर अल्पवयीन मुलगी सानिया (नाव बदलले आहे) हिचे मामा यांनी शिक्रापूर येथे येत शिक्रापूर पोलिसांना घडलेली सर्व हकीगत सांगितली.

त्यांनतर
शिक्रापूर पोलिसांनी तातडीने कासारी येथे जात अल्पवयीन मुलीसह तिची आई व पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याबाबत मुलीचे मामा (रा.गौर, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे वडील व आई (दोन्ही रा.नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) सध्या राहणार कासारी ता. शिरूर जि. पुणे) व नवविवाहित मुलगा प्रवीण लहू मते, मुलाचे वडील लहू रामा मते, आई मंगल लहू मते तिघे राहणार (दहिफळ, ता. कळंब जि. उस्मानाबाद) यांच्यावर गुन्हे दाखल केले असून, सदर गुन्ह्याचा तपास उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा पोलीस स्टेशन येथे रवाना करण्यात आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या