शिरुर तालुक्यातील संगणक परिचालकांचे धरणे आंदोलन

Image may contain: 19 people, people standing and crowdशिरुर, ता. २८ ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर तालुकयातील संगणक परिचालकांनी विविध मागण्यांसाठी शिरुर पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.

याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, संगणक परिचालक हे पद निश्चित करुन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंञज्ञान महामंडळाकडुन नियुक्ती देणे आणि संगणक परिचालकांच्या मानधनाची तरतुद १४ व्या वित्त आयोगातुन न करता शासनाच्या अर्थसंकल्पातुन करणे या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर चार दिवस आंदोलनही करण्यात आले होते.अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत परिचालकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेउन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते.माञ आठ महिन्यानंतरही या निर्णयावर तोडगा न झाल्याने राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन छेडले असल्याचे म्हटले आहे.

राज्यातील सर्व संगणक परिचालकांना आय.टी विभागाकडुन संगणक परिचालक म्हणुन कायमस्वरुपी नियुक्ती द्यावी, सर्व संगणक परिचालकांचे मानधन शासनाच्या निधीतुन देण्यात यावे, एप्रिल २०१७ ते जुलै २०१८चे थकित मानधन देण्यात यावे, छञपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे मानधन देण्यात यावे.

प्रधानमंञी आवास ग्रामीण योजनाचे केलेल्या सर्वेचे मानधन देण्यात यावे अशी मागणी शिरुर तालुक्यातील सर्व संगणक परिचालकांनी केली आहे.यावेळी शिरुर तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षा साविञा वाघचौरे, उपाध्यक्ष महेंद्र खेंगट,सचिव आबासाहेब थोरात यांसह शिरुर तालुक्यातील पुरुष, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या